साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील खडकदेवळा हायस्कूलचे उपशिक्षक चंद्रकांत बाजीराव पाटील यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. सावंतवाडी-कोकण, जि.सिंधुदुर्ग येथील नगरपालिका नाट्यगृहात झालेल्या विशेष समारंभात माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्रासह मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, जिल्हा सचिव प्रवीण मोरे, गजेंद्र कानडे (दोंडाईचा), कुंदा पाटील, कृष्णराव पाटील, भावेश अहिरराव, राजेंद्र पाटील, स्वप्निल बागुल, प्रा.डॉ.गिरीश पाटील (नाशिक), सतीश संदानशिव, स्वाती पाटील, कुमुदिनी पाटील, श्रद्धा अहिरराव, ज्योती संदानशिव आदी मान्यवर उपस्थित होते. विश्वासराव पवार ट्रस्टचे अष्टपैलू शिक्षक चंद्रकांत पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.