साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अचानक थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे पाळधी परिसरातील गरजू, निराधार, अनाथ नागरिकांना पाळधी येथील जीपीएस मित्र परिवारातर्फे ना.गुलाबराव पाटील यांच्या सुचनेवरुन आणि जि.प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जोपासत थंडीत मायेची ऊब देण्यासाठी जीपीएस परिवारातर्फे प्रत्येकी एक किटचे नुकतेच वाटप करण्यात आले. त्यात ब्लँकेट, चादर व जॅकेटचे वाटप करण्यात आले. साहित्य वाटप करीत असताना अनेक निराधार लोकांना अश्रू अनावर झाले होते. अश्या सामाजिक उपक्रमाचे पाळधी परिसरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह संपूर्ण जीपीएस मित्र परिवार उपस्थित होते.