Author: Sharad Bhalerao

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात सालाबादप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. त्यात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सांस्कृतिक गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. तसेच पारितोषिकाचे वितरणही करण्यात आले. पहिल्या पुष्पात अध्यक्षस्थानी राजेंद्र खाडिलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र कवीश्‍वर, सुनंदा कवीश्‍वर, माजी विद्यार्थी तथा मडगव्हाणचे लोकनियुक्त सरपंच तारकेश्‍वर गांगुर्डे, स्वाती गांगुर्डे उपस्थित होते. दुसऱ्या पुष्पात अध्यक्षस्थानी प्रा.रमेश बहुगुणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, नॅशनल युवा को-ऑप सोसायटी पुणेचे डायरेक्टर सरोज पांडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिलीप पाटील यांनी विशेष उपस्थिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी टिळक भवन दादर मुंबई येथे महिलांच्या गुणगौरव कार्यक्रमात विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विकास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्यातून चाळीसगावातील शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष अर्चना रवींद्र पोळ यांनी केलेले सामाजिक, राजकीय कार्य व विज्ञान तंत्रज्ञान कौशल्य विकास विभागात केलेल्या उत्कृष्ट कार्य व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.…

Read More

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी भुपृष्ठ तथा परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यातील दिक्षाभूमी, चिंचोली व कामठीचे ड्रॅगन पॅलेस या तिन्ही धार्मिक स्थळांचे बुद्धिष्ट सर्कीट जाहीर करून त्याकरिता लागणारा एक कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेतून मंजूर करून घेण्याच्या सूचना त्यावेळचे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी नागपूर जिल्हा पर्यटन समितीची बैठक घेऊन तशा प्रकारचा ठराव पास करून नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर यांच्याकडे पाठविला होता. नागपूर सुधार प्रन्यासने बारीक-सारीक मुद्यांवर माहिती गोळा करून बुद्धिष्ट सर्किट जाहीर करण्याकरीता लागणारा खर्च ९६७ कोटी रूपये यावर सविस्तर प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन सांस्कृतीक विभागाला पाठविण्यात आला…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी चोरीची दुचाकी असल्याचे माहित असतानाही ती खरेदी करणाऱ्या एरंडोलच्या संशयिताला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. फारुख हुस्नोद्दीन शेख असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. सविस्तर असे की, एरंडोलमधील संशयित फारुख हुस्नोद्दीन शेख याने चोरीची हिरो शाईन कंपनीची मोटारसायकल विकत घेतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत कारवाईचे दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार सुनील दामोदरे, महेश महाजन, नंदलाल पाटील, संदीप सावळे, नाईक भगवान पाटील, राहुल बेसाणे, अशोक पाटील, ईश्‍वर पाटील आदींनी संशयिताला ताब्यात घेतले. आरोपीचा जळगाव शहर पोलिसांनी घेतला ताबा तपास पथकाने फारुख हुस्नोउद्दीन…

Read More

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी येथील फैजपूर परिसर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात २१ जणांना ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्घाटक म्हणून फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ तर अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य शरद महाजन होते. यावेळी नरेंद्र नारखेडे यांनी पत्रकारांच्या चांगल्या कार्याबद्दल कौतुक केले. तसेच माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी परिसरातील पत्रकारांचे कार्य उल्लेखनीय आहे. म्हणूनच पत्रकारांनी समाजात चांगली कामगिरी करणाऱ्या २१ जणांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले. याबद्दल त्यांनी पत्रकारांचे कौतुक केले. तसेच शरद महाजन यांनी पत्रकारांनी गेल्या कार्यकाळात लोकसेवक मधुकरराव चौधरी तसेच कै.माजी गृहराज्यमंत्री जे. टी. महाजन यांना पत्रकारांची अनमोल साथ व सहकार्य होते. त्यामुळे रावेर, यावल तालुक्याचा मोठ्या प्रमाणावर…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद हे केवळ हिंदुस्थानचे नव्हे तर समस्त जगाचे मार्गदर्शक आहेत. युवकांनी त्यांचे विचार आत्मसात करावेत. आजच्या युवकांना आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी या महापुरुषांचे विचार निश्‍चित उपयोगी आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्‍वनाथ पाटील यांनी केले. वाचनासंबंधीच्या जन-जागृतीसाठी कुऱ्हे पानाचे येथील स्वामी विवेकानंद वाचनालयातर्फे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथ दिंडीचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. जयंतीनिमित्त वाचन संस्कृतीच्या जागर करणाऱ्या ग्रंथ दिंडीला गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे व ग्रंथ-पुस्तकांचे पूजन जिल्हा परिषदेचे व नियोजन समितीचे माजी सदस्य विश्‍वनाथ पाटील यांच्या…

Read More

साईमत, साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील कृषीकन्या मिनाज शेख, चैताली कुऱ्हे, वैष्णवी पालवे व तनुजा पाटील यांनी साकेगावमधील शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके हाताळणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच त्यांना वेगवेगळ्या किडींचा, रोगांचा आणि तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती दिली. प्रात्यक्षिकाकरीता कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. अविनाश कोळगे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बाळासाहेब रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डाँ. सागर बंड व वनस्पती संरक्षण विभागाचे विशेषज्ञ डॉ. गणेश देशमुख, डॉ. नामदेव धुर्वे, डॉ.सागर बंड यांचे मार्गदर्शन लाभले. प्रात्यक्षिकाकरीता…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आ.बं.विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मैदानी खेळासोबत शरीरसौष्ठवाचे उत्तम प्रतिक असणाऱ्या शिवकालिन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे उपाध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्या हस्ते नुकताच झाला. त्याच खेळांचे प्रात्यक्षिक विद्यार्थी प्रजासत्ताकदिनी सादर करणार आहे. मुलांमध्ये मोबाईलचे वाढते आकर्षण आहे. तासन्‌तास ते ऑनस्क्रीन असतात. त्यामुळे मैदानी खेळांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. पारंपरिक खेळ हा शरीरसौष्ठवाचा चांगला स्त्रोत आहे. शिवकालिन मर्दानी खेळांमधून शारीरिक कसरतींना चांगला वाव मिळतो. विद्यार्थ्यांना याद्वारे थेट शिवकालिन खेळांचा परिचय व्हावा. या उद्देशाने आ.बं. विद्यालयाने नेवासेस्थित राजे शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेचे सुरेश लव्हाटे, दिव्या चक्रनारायण, निरंजन वालतुरे यांना…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी विद्यार्थी जीवनात शिस्त, जिद्द, चिकाटी अशा त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यशाचा राजमार्ग सापडत असतो. त्यामुळे शालेय जीवन आयुष्यातील सर्वात सोनेरी पान असल्याचे प्रतिपादन मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.अनिल पाटील यांनी केले. जी.एस.हायस्कुल आणि कै.र.सा.पाटील प्राथमिक शाळेच्या २ दिवसीय स्नेहसंमेलनात अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक तथा संस्थाचालक ओमप्रकाश मुंदडा, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील भामरे, महावीर पतसंस्थेचे चेअरमन प्रकाशचंद पारख उपस्थित होते. शहरातील खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कुल व कै.र.सा.पाटील प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन १२ व १३ जानेवारी रोजी उत्साहात पार पडले. यावेळी खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष तथा कै.र.सा.पाटील शाळेचे…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी मध्य प्रदेशातून अवैधरित्या मालवाहू वाहनातून गुटखा वाहून घेऊन जात असताना मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड शिवारातील बऱ्हाणपूर चौफुलीजवळ बुधवारी, १० जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता वाहनाचा अपघात झाला होता. त्यामुळे पोलिसांना त्या वाहनातून अवैधरित्या वाहतूक होत असलेला १५ लाख ४५ हजाराचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी आठ लाख रुपये किमतीची मालवाहू गाडी आणि १५ लाख ४५ हजार रुपयांचा अवैध गुटखा असा २३ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सविस्तर असे की, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना १० जानेवारी रोजी रात्री दहा वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मुक्ताईनगर तालुक्यातील कुंड गावाजवळ एक मालवाहू गाडी अपघातग्रस्त झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर निरीक्षक…

Read More