साईमत, साकेगाव, ता.भुसावळ : वार्ताहर
ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील कृषीकन्या मिनाज शेख, चैताली कुऱ्हे, वैष्णवी पालवे व तनुजा पाटील यांनी साकेगावमधील शेतकऱ्यांना कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके हाताळणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच त्यांना वेगवेगळ्या किडींचा, रोगांचा आणि तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती दिली.
प्रात्यक्षिकाकरीता कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील, ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमन डॉ. अविनाश कोळगे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बाळासाहेब रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डाँ. सागर बंड व वनस्पती संरक्षण विभागाचे विशेषज्ञ डॉ. गणेश देशमुख, डॉ. नामदेव धुर्वे, डॉ.सागर बंड यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रात्यक्षिकाकरीता मनोज नेहेते, गिरीज नेहेते, धीरज पाटील, केतन पाटील, तुळसाबाई सपकाळे, धनाबाई सपकाळे, दीपाली आढाळे योगिता कोळी, चैताली सोनवणे आदी उपस्थित होते. सरपंच सागर सोनवाल यांनी प्रात्यक्षिकाकरीताा कृषीकन्यांना प्रोत्साहित केले.