फैजपूर परिसर पत्रकार संघातर्फे २१ जणांना ‘समाजरत्न’ पुरस्कार

0
3

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

येथील फैजपूर परिसर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात २१ जणांना ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. उद्घाटक म्हणून फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ तर अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य शरद महाजन होते.

यावेळी नरेंद्र नारखेडे यांनी पत्रकारांच्या चांगल्या कार्याबद्दल कौतुक केले. तसेच माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी परिसरातील पत्रकारांचे कार्य उल्लेखनीय आहे. म्हणूनच पत्रकारांनी समाजात चांगली कामगिरी करणाऱ्या २१ जणांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित केले. याबद्दल त्यांनी पत्रकारांचे कौतुक केले. तसेच शरद महाजन यांनी पत्रकारांनी गेल्या कार्यकाळात लोकसेवक मधुकरराव चौधरी तसेच कै.माजी गृहराज्यमंत्री जे. टी. महाजन यांना पत्रकारांची अनमोल साथ व सहकार्य होते. त्यामुळे रावेर, यावल तालुक्याचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. मधुकर सहकारी साखर कारखाना सुरु असताना अनेक घडामोडी घडल्या. त्यावेळेस पत्रकारांनी पारदर्शक पत्रकारितेच्या माध्यमातून वस्तुस्थिती जनतेसमोर आणून एक चांगले उदाहरण रावेर, यावल तालुक्यात जनतेसमोर ठेवले. म्हणूनच परिसरातील पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद आहे.

यांचा झाला गौरव

ग्रामसेवक बाळू वायकोळे फैजपूर, डॉ. मोहन साळुंके न्हावी, डॉ. दानिश शेख फैजपूर, ॲड. नितीन भावसार फैजपूर, तोहसीफ खाटीक, कौसर शेख फैजपूर, ॲड. स्वप्निल सोनार निंभोरा, ता.रावेर, पोलीस कर्मचारी योगेश दुसाने फैजपूर, सुरेश पाडवी मुक्ताईनगर, निलेश पाडवी मुक्ताईनगर, पंकज बारी इंजिनिअर यावल, स्वप्निल बोरसे उद्योजक यावल, असलम तडवी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, असलम तडवी सामाजिक कार्यकर्ते फैजपूर, पिंटू तेली सामाजिक कार्यकर्ते फैजपूर, अरमान तडवी महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीचे अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार म्हणून सावद्याचे भानुदास भारंबे, राजेंद्र पाटील सावदा, वासुदेव सरोदे फैजपूर, अरुण होले फैजपूर, करुणा राहुल पाटील सावदा अशा २१ जणांना फैजपूर परिसर पत्रकार संघाच्यावतीने समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यांची होती उपस्थिती

नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे, राजू इंजिनियर, कुरबान शेख, माजी नगरसेवक महेबूब पिंजारी, मा. नगरसेवक मनोज कापडे, पीएसआय मकसुद सय्यद, पीएसआय मोहन लोखंडे, ॲड. कैलास शेळके, चंद्रशेखर चौधरी, केतन किरंगे, शरीफ सर, आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉ.शैलेश खाचणे यांचे प्रतिनिधी किरण पाटील, सद्गुरु हॉस्पिटलचे डॉ.अमित हिवराळे, गजानन हॉस्पिटलचे अभिजीत सरोदे, संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. दिलीप भटकर यांची उपस्थिती होती.

यशस्वीतेसाठी फैजपूर परिसर पत्रकार अध्यक्ष सलीम पिंजारी, उपाध्यक्ष राजू तडवी, फैजपूर येथील पत्रकार फारुक शेख, योगेश सोनवणे, इंदु पिंजारी, प्रा. राजेंद्र तायडे, शाकीर मलिक, संजय सराफ, दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here