साईमत, यावल : प्रतिनिधी शहरात ओला आणि सुका कचरा संकलन करण्याची घंटागाडी अनियमितपणे येत आहे. त्यामुळे यावल शहरातील संतप्त नागरिकांनी घरातील कचऱ्याचे डस्टबिनचे डबे नगरपालिकासमोर येऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ओला आणि सुका कचरा संकलन करण्यासाठी संबंधित ठेकेदार आपल्या सोयीनुसार एक-दोन दिवसाआड फिरून अनियमितपणे यावल शहरात ओला व सुका कचरा संकलित करतात. लोकांच्या घरात ओला, सुका कचरा साचला जातो. त्यामुळे यावलकर वैतागले आहेत. शेवटी घंटागाडी न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करण्यासाठी आपआपल्या घरातील कचऱ्याचे डस्टबीनचे डबे उचलून नगरपालिका कार्यालयासमोर आणून निषेध व्यक्त केला. त्यामुळे यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित करून ओला व सुका कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराचे पेमेंट…
Author: Sharad Bhalerao
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जीपीएस कॅम्पसमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी ८ बीएन बीएसएफ सीमानगर वेस्ट बंगालला कार्यरत फौजी नरेंद्र मधुकर चौधरी होते. यावेळी पाळधी येथील सरपंच विजय पाटील, उपसरपंच राहुल धनगर, गुलाब पाटील, अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र साळुंखे, कैलास इंगळे, चंद्रकांत इंगळे, चंदन कळमकर, बापू कोळी, श्रीकृष्ण साळुंखे, संजय महाजन, माजी सरपंच धर्मा सपकाळे, भगवान धनगर उपस्थित होते. कार्यक्रमास चिमुकल्यांनी भाषणाद्वारे आपली देशभक्ती व आपली कर्तव्य भाषणातून सांगितली. तसेच…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी जळगाव येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत येथील स्वराज्य प्रतिष्ठान संचलित पोदार जीनियस इंटरनॅशनल स्कुल शाळेने यावर्षी पहिल्यांदाच आपला सहभाग नोंदविला होता. तसेच नाटकात अभिनव नंदलाल पाटील ह्या चिमुकल्याने उत्कृष्ट भूमिका साकारुन तोही राज्य बाल नाट्य स्पर्धेत चमकला. तो डॉ.नंदलाल पाटील यांचा चिरंजीव आहे. उत्कृष्ट कथालेखन, पात्रांचा जिवंतपणा, साजेसे नेपथ्य आणि प्रेक्षकांच्या टाळ्या यामुळे छत्रपती संभाजीराजे नाट्य सभागृहात सादर झालेल्या ‘सुपर पावर’ नाटकाचे लेखन-दिग्दर्शन संतोष मधुकर शिराळे यांनी केले होते. नाटकात कलाकार म्हणून विद्यार्थ्यांनी आपापली भूमिका उत्कृष्ठपणे साकारली. याच नाटकात पात्र साकारणाऱ्या अभिनव पाटील ह्या चिमुकल्या कलाकार विद्यार्थ्याला गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील हिरूभाई हिमाभाई पटेल प्राथमिक विद्यालय आणि अन्नपूर्णाबाई पाटसकर बालक मंदिरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी शाळेचे चेअरमन तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक बागड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन केले. यावेळी बालमित्रांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. बालक मंदिर ते चवथीच्या विद्यार्थ्यांनी भाषण व देशभक्तीपर गीत सादर केले. तसेच शाळेचे उपशिक्षक योगेंद्र राजपूत यांनी तंबाखू मुक्तीविषयी शपथचे वाचन केले. प्रभा नवले यांनी बालमित्रांकडून पिरॅमिडची प्रात्यक्षिके सादर केली. संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राहुल पाटील यांनी फलक लेखन केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, विद्यार्थी,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी नॅकच्या सातमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे. दर्जेदार अभ्यासक्रम तथा महाविद्यालयीन गुणवत्ता वाढीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. जयेश गुजराथी यांनी केले. महाविद्यालयात भेट याविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी सोप्या भाषेत दिली. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी योग्य ती मदत करू, असे वचनही त्यांनी दिले. येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विजय नाना आर्मी स्कुलचे प्राचार्य पी.एम.कोळी होते. मेळाव्याचे मार्गदर्शक डॉ. गुजराथी यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य पी.एम.कोळी यांनी गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या कंपनीची उदाहरणे देत महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक यांना काळानुसार बदलावे लागेल, बदल…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी मित्र जीवनातील एक वेगळे नाते आहे. त्याची जोपासना केली पाहिजे. मैत्रीचे जग हे खूप व्यापक आहे. म्हणून निसर्गातील प्रत्येक घटकांशी मैत्री असली पाहिजे. तसेच चांगले मित्र मिळविण्यासाठी आपणही चांगले असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ.एस. टी. भुकन यांनी केले. विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैत्री शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटक म्हणून लाभलेले डॉ.एस. टी. भुकन, अधिष्ठाता, आंतर शाखीय विद्याशाखा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांनीही मैत्रीचे विविध प्रकार सांगत मैत्री ही…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे २५ जानेवारी २०२४ रोजी वकील दाम्पत्याची त्यांचेच पक्षकार असलेल्या आरोपींनी निर्घृणपणे हत्या केली. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण वकीलांमध्ये रोषाचे तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वकीली करत असतांना, वकीलांना बऱ्याचशा आरोपींसोबत संबंध चांगले तथा खराब करावे लागतात. त्यामुळे आरोपीच्या मनामध्ये वकीलांविरूध्द द्वेष निर्माण होऊन त्यातून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत आहे. परंतु वकीलांच्या संरक्षणासाठी अद्याप महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा अस्तित्वात नाही. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागु करण्यात यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. मलकापूर वकील संघाने सोमवारी, २९ जानेवारी रोजी कामबंद आंदोलन करुन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी आजी-माजी पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांच्या विविध समस्या व मागण्या पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी संबंधित अधिकारी व यंत्रणेकडे रितसर अर्ज केलेले आहेत. मात्र, अर्जाची दखल घेण्यात आली नसल्यामुळे २६ जानेवारी, २०२४ पासून ५ लोक उपोषणास बसलेले आहे. तसेच शेकडो होमगार्ड व त्यांचे परिवारातील सदस्यही समर्थन देण्यासाठी धरणे आंदोलन करुन आंदोलनात सहभागी झालेले आहेत. सोमवारी, २९ जानेवारी रोजी आंदोलनाचा ४ था दिवस होता. त्यामुळे आंदोलनाची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अशा आशयाचे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले आहे. उपोषणामुळे प्रचंड त्रास होत असुन शारीरिक समस्या जाणवत आहे. न्याय मिळावा म्हणून उपोषण सुरु ठेवणार आहे.…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील तयारीचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी, २९ जानेवारी रोजी आढावा घेतला. साहित्य संमेलनाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही. त्याची दक्षता घेण्याच्या प्रशासनाला व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ कालावधीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रताप महाविद्यालयात बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. याप्रसंगी खान्देश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, उपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक निरज अग्रवाल, मराठी वाड्मय मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू असतांना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आहे. आंदोलनाला वाढत चाललेला पाठिंबा बघता महाराष्ट्र शासनाने २७ जानेवारी रोजी रात्री तीन वाजता नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तसेच त्यांच्या सगे सोयरे यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले. कोणताही दगा फटका न करण्याचा व न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारे आरक्षण दिल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री मंडळातील त्यांचे सहकारी गिरीश महाजन आणि दीपक केसरकर यांच्या साक्षीने दिला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेऊन विजयी गुलाल उधळण्याचे जाहीर केले. याबद्दल जामनेरात सकल मराठा समाजाच्यावतीने…