वकीलाच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ वकील संघातर्फे कामबंद आंदोलन

0
1

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे २५ जानेवारी २०२४ रोजी वकील दाम्पत्याची त्यांचेच पक्षकार असलेल्या आरोपींनी निर्घृणपणे हत्या केली. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण वकीलांमध्ये रोषाचे तसेच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वकीली करत असतांना, वकीलांना बऱ्याचशा आरोपींसोबत संबंध चांगले तथा खराब करावे लागतात. त्यामुळे आरोपीच्या मनामध्ये वकीलांविरूध्द द्वेष निर्माण होऊन त्यातून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत आहे. परंतु वकीलांच्या संरक्षणासाठी अद्याप महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा कायदा अस्तित्वात नाही. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागु करण्यात यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

मलकापूर वकील संघाने सोमवारी, २९ जानेवारी रोजी कामबंद आंदोलन करुन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनास निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी ॲड. जी.व्ही.सोमण, ॲड एस. एस. मोरे, ॲड. एस. डी.रावत, ॲड.जी.डी.पाटील, ॲड. मजित कुरेशी, ॲड. एन. बी.धुत, ॲड.स्नेहल तायडे, ॲड.आर .व्ही. पाटील, ॲड.अविनाश तांदुळकर आदी वकिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here