महाविद्यालयात गुणवत्ता वाढीसाठी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्‍यक

0
1

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

नॅकच्या सातमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्‍यक आहे. दर्जेदार अभ्यासक्रम तथा महाविद्यालयीन गुणवत्ता वाढीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. जयेश गुजराथी यांनी केले. महाविद्यालयात भेट याविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी सोप्या भाषेत दिली. कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी योग्य ती मदत करू, असे वचनही त्यांनी दिले. येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विजय नाना आर्मी स्कुलचे प्राचार्य पी.एम.कोळी होते. मेळाव्याचे मार्गदर्शक डॉ. गुजराथी यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

प्राचार्य पी.एम.कोळी यांनी गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या कंपनीची उदाहरणे देत महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षक यांना काळानुसार बदलावे लागेल, बदल स्वीकारावा लागेल, असे भाषणात सांगितले.

मेळाव्याला डॉ. एन.जी.पाचपांडे, डॉ.जे.एन.चव्हाण, प्रा. डॉ. अंजली जोशी, प्रा.यु.बी.पाटील, शिक्षकेतर कर्मचारी अनिकेत सूर्यवंशी, किरण रावळ, राजेंद्र वाघ, सोपान पाटील, विनोद सोनवणे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी.पी. चौधरी, सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनंदा तायडे तर आभार डॉ. जे.एन.चव्हाण यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here