पाळधीला जीपीएस कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

0
1

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जीपीएस कॅम्पसमध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी ८ बीएन बीएसएफ सीमानगर वेस्ट बंगालला कार्यरत फौजी नरेंद्र मधुकर चौधरी होते. यावेळी पाळधी येथील सरपंच विजय पाटील, उपसरपंच राहुल धनगर, गुलाब पाटील, अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र साळुंखे, कैलास इंगळे, चंद्रकांत इंगळे, चंदन कळमकर, बापू कोळी, श्रीकृष्ण साळुंखे, संजय महाजन, माजी सरपंच धर्मा सपकाळे, भगवान धनगर उपस्थित होते.

कार्यक्रमास चिमुकल्यांनी भाषणाद्वारे आपली देशभक्ती व आपली कर्तव्य भाषणातून सांगितली. तसेच कार्यक्रमास तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ऑलम्पियाड गणित विषयात राज्यस्तरावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक चेअरमन विक्रम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेचे मार्गदर्शक जि.प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील, संस्थेचे चेअरमन विक्रम पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.कंखरे, इंग्लिश मीडियम स्कुल जयश्री सूर्यवंशी, ज्युुनिअर कॉलेज डॉ. सुनील खंडकाळे, सिनियर कॉलेजचे उत्तम फारसे तसेच इतर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पथसंचलन चंद्रशेखर काळकर यांनी केले. सूत्रसंचालन गुरमीत सोनवाल, प्रा.भूषण पाटील तर क्रीडा शिक्षक राकेश धनगर, शुभम भोई, प्रा. शुभांगी सोनवणे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here