साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२३-२०२८ पंचवार्षिक मुदतीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात पतसंस्थेच्या चेअरमनपदी सतिष दीपचंद माळी तर व्हाईस चेअरमन म्हणून रवींद्र दिगंबर माळी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मोतीराम धडू माळी, शांताराम रामा माळी, विठ्ठल राजाराम माळी, पांडुरंग खंडू तायडे, सुशीला गोविंदा महाजन, रंजना दगडू माळी, युवराज दगडू माळी, दगडू सुकलाल धनगर, भगवान भिकारी बाविस्कर तर स्वीकृत सदस्य म्हणून नामदेव राजाराम महाजन, छगन देवराम महाजन यांचा समावेश आहे. यावेळी समस्त फुलमाळी समाजचे उपाध्यक्ष पुंडलिक महाजन, खजिनदार दगडू माळी, सदस्य छगन माळी, नामदेव महाजन, खंडू…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील तालुका मनियार बिरादरीकडून ‘मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी’चा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन नुकताच गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मुक्ताईनगर तालुका मुस्लिम मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकिम चौधरी, मनियार मस्जिदचे मुतवल्ली कलीम मनियार, सदस्य रफिक शेख मजीद मनियार, खजिनदार अहमद ठेकेदार यांच्या हस्ते देण्यात आला. मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीच्या माध्यमातून मुक्ताईनगर शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यात वृक्षारोपण, संत मुक्ताई यात्रेत स्वच्छता अभियान राबविणे, पाणपोई लावणे, मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेणे, आरोग्य संदर्भात सायकलींगद्वारे जनजागृती करणे, अकस्मात, अपघाती लोकांना आर्थिक मदत करणे यांचा समावेश आहे. म्हणून त्या कामांची दखल घेऊन मुक्ताईनगर तालुका मुस्लिम मनियार…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येत्या ३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीतर्फे आयोजित केलेल्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत दोन भव्य सभा मंडप आहेत. ३ दालनांमध्ये बालमंच, युवा मंच यासह ४ विचार मंचावर विद्रोहीचे विविध कार्यक्रम बहरणार आहेत. दोन दिवसांमध्ये विद्रोहीत ३ परिसंवाद होणार आहे. तसेच १३ गटचर्चा आणि एक विशेष व्याख्यान होईल. ४ गझल आणि काव्य संमेलन व शेकोटी काव्य मैफिल असेल. ३ सत्रात साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांशी साहित्य गप्पा व संवाद होईल. सांस्कृतिक व कला प्रकारात…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील राघवेंद्र ग्रुपचे ॲग्नेस इंटरनॅशनल स्कुल आणि जेएमसीई डिप्लोमा कॉलेजमध्ये शालेय संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाला विनोदी अभिनेते भाऊ कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या खास शैलीतील विनोदातून उपस्थित चाहत्यांसह विद्यार्थ्यांची मने जिंकली. अभिनेते भाऊ कदम यांच्या समवेत कर्नाटकचे माजी आमदार मनोहर ऐनापुर, साऊथचे कलाकार राहुल ऐनापूर, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती वनमाला राठोड, डॉ.शुमा राठोड, निखिल राठोड आदी उपस्थित होते. तसेच मराठी अभिनेते साहेबराव काळे, नगरसेविका सविता राजपूत, सामाजिक कार्येकर्ते योगेश पाटील यांच्यासह प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, पालक उपस्थित होते.
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर मोहाडी-धानोरा-लमांजन-म्हसावद रस्त्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच भूमीपूजन करण्यात आले. २ कोटी ३० लाख रुपये खर्चून रस्त्याचे काम हे दोन टप्प्यात होणार आहे. म्हसावदला रस्त्यावर वारंवार पाणी साचत असल्यामुळे रस्ता दुरुस्ती करूनही खराब होत होता. परिणामी रस्त्याचे ५० मीटर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे, जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था विकासचे संचालक रमेश पाटील, सरपंच गोविंद पवार, माजी सभापती बापू पवार, माजी उपसभापती समाधान चिंचोरे, माजी उपसरपंच शितल चिंचोरे, हौशीलाल भोई, महेंद्र राजपूत, श्री. खोडपे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील मुख्य रस्त्यावरत पाणी साचत असल्यामुळे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरामुळे सक्षम युवा घडतो. शिबिरामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार शिबिर म्हणजेच सक्षम युवा घडविणारे ठरत असल्याचे प्रतिपादन शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी केले. शिबिरामुळे मुलींनी कशी प्रगती करावी, याबद्दल त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग सांगितले. जीवन जगतांना त्याचा कसा फायदा झाला, याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. शिबिरासाठी मुलींची संख्या पाहून त्यांनी महाविद्यालयासह कार्यक्रम अधिकाऱ्यांचे कौतुक केले. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित बी. पी. आर्ट्स, एस. एम . ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स व के. आर. कोतकर महाविद्यालय चाळीसगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आयोजित विशेष…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी ‘जय महाराष्ट्र न्यूज चॅनल’तर्फे आयोजित ‘महाराष्ट्र व्हीजन २०३०’ कार्यक्रमात सौर ऊर्जेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री तथा संस्थाध्यक्ष विजय नवल पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. ‘जय महाराष्ट्र न्यूज चॅनल’तर्फे कृषी, शिक्षण, निसर्ग ऊर्जा, सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १५ कर्तृत्ववान मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. चार वेळा खासदारपदी निवडून येण्याची किमया करणारे तसेच सौर ऊर्जेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. विशेष बाब म्हणजे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याही हस्ते त्यांना सौर ऊर्जेवर चालणारा प्रथम रेडिओ भेट देण्यात आला होता. सन्मान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ‘जय महाराष्ट्र न्यूज…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी तालुक्यातील अकलूद येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील लाखोंचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी, २९ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, राजेश गुनघरजी नखाते (जैन, वय ४५, रा. प्लॉट नंबर ४१, समर्थ नगर, अकलुद, ता. यावल) हे पत्नी ज्योती, मुले तेजल आणि जय परिवारासह वास्तव्याला आहे. ते प्रॉपर्टी ब्रोकरचे काम करुन उदरनिर्वाह करतात. शनिवारी, २७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता अकलुद येथुन मुंबई येथे सेमीनारसाठी गेले होते.तेव्हा ज्योती नखाते ह्या रात्री ९.३० वाजता अकलुद येथुन अकोला येथे गेल्या होत्या. सोमवारी, २९ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नखाते…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी महास्वामीत्व योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सनद वाटप कार्यक्रमाचा जळगाव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी प्रारंभ करण्यात आला. पालकमंत्र्यांनी प्रारंभ केलेल्या मोहिमेत जिल्ह्यात गावठाणातील घर जागेच्या मालकी हक्क आणि नकाशाच्या ९५० सनदांचे वाटप केले. त्यातून तीन लाख ९५ हजार रूपयांचा महसूल शासनाला प्राप्त झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी कलाबाई चिंतामण कोळी, कमलबाई रमेश गायकवाड आणि शिवलाल गिरमा सोनवणे या शेतकऱ्यांना पोलीस परेड मैदानावर सनदाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने जिल्ह्यात २६ व २७ जानेवारी २०२४ रोजी सनद वाटप मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली. स्वामीत्व योजनेअंतर्गत गावठाण सर्वे झालेल्या जळगाव…
साईमत, यावल : प्रतिनिधी गेल्या ६ महिन्यापासून यावल-भुसावळ रस्त्याचे आणि गटारीचे बांधकाम सुरू आहे. परंतु यावल-भुसावळ रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्ता खराब झाला आहे. त्याची साधी डागडुजी न करता आता सार्वजनिक बांधकाम विभागाने राजोरा फाट्यापासून तर वाघळुद फाट्यापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याचे काम सुरू करताना प्रचंड वाहतुकीचा अंदाज न घेता दोघी बाजूचा रस्ता खोदून टाकल्याने आणि त्यावर खडी पसरविल्याने चार चाकी, दुचाकी वाहनधारकांना आपली वाहने चालविताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार वाहनधारक नागरिकांचा ‘छळ’ करीत आहे. तसेच कामाबाबत ठेकेदाराने काम सुरू करण्याच्या आधी कोणत्या योजनेतून काम…