महात्मा फुले नागरी सह. पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

0
2

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२३-२०२८ पंचवार्षिक मुदतीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात पतसंस्थेच्या चेअरमनपदी सतिष दीपचंद माळी तर व्हाईस चेअरमन म्हणून रवींद्र दिगंबर माळी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी मोतीराम धडू माळी, शांताराम रामा माळी, विठ्ठल राजाराम माळी, पांडुरंग खंडू तायडे, सुशीला गोविंदा महाजन, रंजना दगडू माळी, युवराज दगडू माळी, दगडू सुकलाल धनगर, भगवान भिकारी बाविस्कर तर स्वीकृत सदस्य म्हणून नामदेव राजाराम महाजन, छगन देवराम महाजन यांचा समावेश आहे.
यावेळी समस्त फुलमाळी समाजचे उपाध्यक्ष पुंडलिक महाजन, खजिनदार दगडू माळी, सदस्य छगन माळी, नामदेव महाजन, खंडू महाजन, दीपक महाजन, योगराज महाजन, शालिक महाजन, बापू महाजन, दशरथ महाजन, शांताराम माळी, समाधान माळी, दौलत माळी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here