मनियार बिरादरीकडून ‘मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी’चा गौरव

0
1

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी

येथील तालुका मनियार बिरादरीकडून ‘मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी’चा स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन नुकताच गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मुक्ताईनगर तालुका मुस्लिम मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकिम चौधरी, मनियार मस्जिदचे मुतवल्ली कलीम मनियार, सदस्य रफिक शेख मजीद मनियार, खजिनदार अहमद ठेकेदार यांच्या हस्ते देण्यात आला.

मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीच्या माध्यमातून मुक्ताईनगर शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. त्यात वृक्षारोपण, संत मुक्ताई यात्रेत स्वच्छता अभियान राबविणे, पाणपोई लावणे, मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेणे, आरोग्य संदर्भात सायकलींगद्वारे जनजागृती करणे, अकस्मात, अपघाती लोकांना आर्थिक मदत करणे यांचा समावेश आहे. म्हणून त्या कामांची दखल घेऊन मुक्ताईनगर तालुका मुस्लिम मनियार बिरादरीने त्यांना ‘भारतरत्न मौलाना आझाद पुरस्कार २०२४’ पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here