मोहाडी-धानोरा-लमांजन-म्हसावद रस्त्याचे भूमिपूजन

0
4

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

मोहाडी-धानोरा-लमांजन-म्हसावद रस्त्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच भूमीपूजन करण्यात आले. २ कोटी ३० लाख रुपये खर्चून रस्त्याचे काम हे दोन टप्प्यात होणार आहे. म्हसावदला रस्त्यावर वारंवार पाणी साचत असल्यामुळे रस्ता दुरुस्ती करूनही खराब होत होता. परिणामी रस्त्याचे ५० मीटर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे, जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था विकासचे संचालक रमेश पाटील, सरपंच गोविंद पवार, माजी सभापती बापू पवार, माजी उपसभापती समाधान चिंचोरे, माजी उपसरपंच शितल चिंचोरे, हौशीलाल भोई, महेंद्र राजपूत, श्री. खोडपे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील मुख्य रस्त्यावरत पाणी साचत असल्यामुळे त्यात ५० मीटर रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. उर्वरित रस्ता हा डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here