साईमत, यावल : प्रतिनिधी यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपप्रणित ‘सहकार पॅनल’ने मंत्री गिरीश महाजन यांच्या व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नियोजनबद्ध प्रचार निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आ.शिरीष चौधरी) आणि महाविकास आघाडी प्रणित ‘शेतकरी विकास पॅनल’चा दारुण पराभव झाला. पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे यावलचे तालुकाध्यक्ष तथा विद्यमान संचालक प्रभाकर सोनवणे, चेअरमन अमोल भिरुड, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देवकांत पाटील, नीलिमा चेतन किरंगे, अनिता हेमंत येवले, सतीश हरिचंद्र पाटील यांचा पराभव कशामुळे झाला, याबाबत तालुक्यात चर्चा सुरू आहे. पंचवार्षिक निवडणुकीत १७ जागांपैकी १६ जागांवर भाजप-शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी रिपाई आठवले गट प्रणित…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भागाची दहा भागात विभागणी करून विभागनिहाय बैठका घेण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस चाळीसगाव तालुक्याच्यावतीने केले आहे. चाळीसगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘विजय संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आ. राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघाचे चेअरमन शशी साळुंखे, ज्येष्ठ नेते प्रदीप देशमुख, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, बाजार समितीचे संचालक दिनेश पाटील, ईश्वर ठाकरे, कैलास सूर्यवंशी, सतीश दराडे, भास्कर पवार, भगवान पाटील, मंगेश पाटील, श्याम देशमुख, दीपक पाटील, रामचंद्र जाधव, छगन पाटील, बाजीराव दौंड, भूषण पाटील, भैय्यासाहेब पाटील, मोहित भोसले, शुभम पवार, सुरेश पगारे, अजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्व…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर येथून जवळील पाळधी येथील क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात २००१ च्या बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सुगंध स्मृतीचा स्नेहसंमेलन मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी के.एस.कळसकर होते. सुरुवातीला मान्यवर शिक्षकांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तब्बल २३ वर्षानंतर कार्यक्रमातील उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या दिवसाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला स्नेहदीप गरुड, माजी मुख्याध्यापक के.एस. कळसकर, डब्ल्यू. एस.पाटील, एस.जी.माळी, एम.एल.पाटील, एम.के.बावस्कर, पी.व्ही.पाटील, श्री.नखोले, सी.एम.मोरे, डी.टी.बाविस्कर, डी.एस.पाटील, आर.डी.चौधरी, ए.ए.पाटील, एस. बी. निकम, ए.ए.बेले, भागवत पाटील आप्पा, मुख्याध्यापक पी.एस.पाटील, पर्यवेक्षक एस.एन.पाटील, एन.टी.पाटील, वाय.एस. पाटील, गणेश पाटील, किशोर पाटील,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी समता सैनिक दलाच्या कोअर, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची प्रथम त्रैमासिक बैठक ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे रविवारी, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी पार पडली. बैठकीला सर्व राष्ट्रीय कोअर कमिटी, राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक खनाडे होते. बैठकीत कोअर कमिटीचे अध्यक्ष अशोक टेंभरे, समन्वयक धम्मा कांबळे, राष्ट्रीय महासचिव प्रा.गुलाबराव राजे, बौद्धिक प्रमुख रमेश जाधव, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजाभाऊ कदम, राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर मत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. बैठकीच्या विषय पत्रिकेनुसार बैठकीचे कामकाज सुरू करण्यात आले. त्यात विविध विषयांवर उपस्थित सर्वांनी सविस्तर चर्चा करून एकमताने निर्णय घेतले. देशासमोरील ज्वलंत…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक न्याय तथा केंद्रीय राज्यमंत्री ना.डॉ. रामदास आठवले यांच्या आदेशाने तसेच राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे, राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या सूचनेनुसार चाळीसगाव न.पा.चे नगरसेवक तथा आरपीआयचे ज्येष्ठ नेते आनंद जी.खरात यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या पश्चिम जळगाव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. त्यांचा सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्राचा जनसंपर्क व समाजकार्य सातत्याने तीन साडेतीन दशक एक पक्षनिष्ठा राखून ठेवल्याने सर्व बाबींचा दीर्घ अनुभव विचारात घेऊन पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्ष संघटन गतिमान करण्यासाठी निवड केली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या सत्यशोधक मुक्ता साळवे बालमंचावरील बाल कलाकारांनी विद्रोहीच्या मंचावर सादर केलेल्या समूह गीते, नाट्यभिनय, वेशभूषा व प्रबोधन गीतांना उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. सर्व मुला-मुलींनी सुंदर सादरीकरण केले. नाट्याभिनयात विविध संदेश देणाऱ्या नाटिका पाहून प्रेषक मंत्रमुग्ध होऊन गेले होते. उद्घाटन प्रा.उल्हास पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एल.जे गावित होते. यावेळी स्वागत शाम पाटील यांनी केले. शहीद भगतसिंग युवा मंचचे दुपारच्या सत्रात उद्घाटन भरत यादव यांनी केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गोपाळ नेवे, पुरूषोत्तम आवारे पाटील होते. अध्यक्षस्थानी ॲड.नाना अहिरे होते. मंचचे संयोजक बळवंत भालेराव, प्रा यशवंत मोरे होते. सत्राची सुरूवात…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी अग्नीशस्त्र आणि घातक हत्यार बाळगून लोकांवर दहशत निर्माण करणारा गुन्हेगारी वृत्तीचा रवी उर्फ माया महादेव तायडे (वय २५, रा. भोईवाडा मुक्ताईनगर) याच्यावर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात दरोडा १, जबरी चोरी ५, गंभीर दुखापत १, आर्म ॲक्ट ४, असे ११ गुन्हे व करण्यात आलेली प्रतिबंधक कारवाई २ अशी गुन्ह्यांची पध्दत २०१७ पासून होती. मुक्ताईनगर पोलीस ठाणे अंतर्गत पाच, भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाणे अंतर्गत चार, भुसावळ शहर पोलीस ठाणे अंतर्गत एक, इगतपुरी जिल्हा नाशिक पोलीस स्टेशन अंतर्गत एक असे अकरा प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे एमपीडीए कायद्याअंतर्गत माया तायडे याला…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील एणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल असलेल्या गर्भवती महिलेला अचानक कळा सुरू झाल्या. कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून जुळ्या बाळांची सुखरूप आणि नॉर्मल डिलिव्हरी करून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. आजकाल बाळंतपण म्हटले की, अत्यंत कठीण आणि जिकरीचा विषय झाला आहे. त्यातल्या त्यात सिझेरियन प्रकारामुळे मोठमोठ्या दवाखान्यांमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच एखाद्या गरोदर महिलेस जर जुळी मुले असतील तर तिची डिलिव्हरी सिझेरियन केल्याशिवाय होतच नाही. असा एक प्रघात पडला आहे. मात्र, अशा प्रघाताला छेद देत, आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा कस लावत एणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.रवींद्र शोभणे यांनी अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनात अचानक भेट दिली. मुख्य सभामंडपात प्रमुख चर्चासत्र सुरू असतांना मोठ्या लवाजमावासह डॉ. रवींद्र शोभणे यांनी भेट देत असतांना विद्रोहीच्या संयोजकांनी जेवणाचा आग्रह केला तर विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रक रणजित शिंदे यांनी बळीराजा अन्न शिवारात डॉ.रवींद्र शोभणे यांचे तोंड गोड केले. डॉ.शोभणे यांनीही शिंदे यांना गोड खावू घातले. याप्रसंगी विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीचे स्थानिक अध्यक्ष गौतम मोरे, स्वागताध्यक्ष श्याम पाटील, मुख्य समन्वयक प्रा.अशोक पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील मालेगाव बायपासवरील हॉटेलमध्ये दोघांनी १४ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना १८ जानेवारी २०२४ रोजी १२ ते ५ वाजेदरम्यान घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या महिलेवर शनिवारी, ३ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातीलच एका महिलेने शहरातील मालेगाव-कन्नड बायपास रस्त्यावरील वरील हॉटेल निवांत येथे कामाला जायचे आहे, असे सांगून १८ रोजी घेवून गेली. तेथे संशयित आरोपी रवींद्र राजपुत (रा.चाळीसगाव) याने संशयित आरोपी केवलसिंग कछवा (रा.चाळीसगाव) यास बोलावून घेतले. हॉटेलच्या झोपडीत असलेली मुलगी आणि दोघा आरोपींना महिलेने…