चाळीसगावला दोघांनी केला १४ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरातील मालेगाव बायपासवरील हॉटेलमध्ये दोघांनी १४ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना १८ जानेवारी २०२४ रोजी १२ ते ५ वाजेदरम्यान घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या महिलेवर शनिवारी, ३ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातीलच एका महिलेने शहरातील मालेगाव-कन्नड बायपास रस्त्यावरील वरील हॉटेल निवांत येथे कामाला जायचे आहे, असे सांगून १८ रोजी घेवून गेली. तेथे संशयित आरोपी रवींद्र राजपुत (रा.चाळीसगाव) याने संशयित आरोपी केवलसिंग कछवा (रा.चाळीसगाव) यास बोलावून घेतले. हॉटेलच्या झोपडीत असलेली मुलगी आणि दोघा आरोपींना महिलेने झोपडीत बसवून बाहेरून दरवाजा बंद केला. दोघा आरोपींनी मुलीवर अतिप्रसंग केला. त्यानंतर महिलेने ही घटना कोणास सांगु नको, नाहीतर तुझी बदनामी होईल, अशी पीडित मुलीला धमकी दिली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ३ आरोपी विरोधात संबंधित कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ३(अ), ४(२), ५(ग), ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here