पाळधीतील नाईक विद्यालयात २००१मधील बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

0
1

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

येथून जवळील पाळधी येथील क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात २००१ च्या बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सुगंध स्मृतीचा स्नेहसंमेलन मेळावा आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी के.एस.कळसकर होते. सुरुवातीला मान्यवर शिक्षकांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तब्बल २३ वर्षानंतर कार्यक्रमातील उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या दिवसाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला स्नेहदीप गरुड, माजी मुख्याध्यापक के.एस. कळसकर, डब्ल्यू. एस.पाटील, एस.जी.माळी, एम.एल.पाटील, एम.के.बावस्कर, पी.व्ही.पाटील, श्री.नखोले, सी.एम.मोरे, डी.टी.बाविस्कर, डी.एस.पाटील, आर.डी.चौधरी, ए.ए.पाटील, एस. बी. निकम, ए.ए.बेले, भागवत पाटील आप्पा, मुख्याध्यापक पी.एस.पाटील, पर्यवेक्षक एस.एन.पाटील, एन.टी.पाटील, वाय.एस. पाटील, गणेश पाटील, किशोर पाटील, सुरेखा बावस्कर, वंदना देशमुख, थोरातआप्पा, गणेशआप्पा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री पाटील हिने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here