एणगावला प्राथमिक आरोग्य केंद्रात जुळ्या मुलींचा जन्म

0
4

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

तालुक्यातील एणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल असलेल्या गर्भवती महिलेला अचानक कळा सुरू झाल्या. कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून जुळ्या बाळांची सुखरूप आणि नॉर्मल डिलिव्हरी करून सर्वांनाच आश्‍चर्याचा सुखद धक्का दिला.

आजकाल बाळंतपण म्हटले की, अत्यंत कठीण आणि जिकरीचा विषय झाला आहे. त्यातल्या त्यात सिझेरियन प्रकारामुळे मोठमोठ्या दवाखान्यांमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच एखाद्या गरोदर महिलेस जर जुळी मुले असतील तर तिची डिलिव्हरी सिझेरियन केल्याशिवाय होतच नाही. असा एक प्रघात पडला आहे. मात्र, अशा प्रघाताला छेद देत, आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा कस लावत एणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चमत्कार घडविला आणि येवती येथील महिलेचे बाळंतपण सुखरूप आणि नॉर्मल पद्धतीने केले. त्याबद्दल डॉक्टरांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र एणगाव येथे जुळ्या मुलींची नॉर्मल डिलिव्हरी वैद्यकीय अधिकारी डॉ.अक्षय नाईक यांनी यशस्वीरित्या केली.

गरोदर महिला रुग्णाचे नाव दृपदा विनोद गायकवाड असे आहे. ही महिला सोनोटी येथील रहिवासी आहे. तिची ही चौथी खेप होती. त्यांना जुळ्या नॉर्मल मुली झाल्या. प्रसुती करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय नाईक सोबत नर्स ज्योती सुरळकर, आरोग्य सहाय्यक संजय सुरळकर, आरोग्य सेवक अमोल पाटील, युनूस शेख, विजय थांबेत, राहुल सावळे, गट प्रवर्तक लता वाघचौरे, वाहन चालक पुरुषोत्तम तळले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here