साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचालित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयातर्फे एक नवीन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लोहारा गावात दोन दिवस चौधरी गल्ली, संत जगनाडे महाराज चौक, शिवाजीनगर, तपेश्वर नगर अशा ठिकठिकाणी कॉर्नर सभा नुकत्याच घेण्यात आल्या. सभेला विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके, पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविकात वाय.पी.वानखेडे यांनी सभेचा उद्देश, शाळेतील शिक्षकांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्या याविषयीची माहिती विद्यार्थ्यांसह पालकांना करून दिली. यावेळी आर.सी.जाधव, आर.के.खोडपे यांनीही मनोगतातून पालकांनी परीक्षा काळात मुलांकडे कशा पद्धतीने लक्ष द्यावे, कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षेला निर्भीडपणे सामोरे जाऊन यश…
Author: Sharad Bhalerao
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील भाऊसाहेब तुकाराम आनंदा माळी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध जाहीर करण्यात आली. त्यात पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. सुभाष घोंगडे तर व्हाईस चेअरमनपदी विठ्ठल बनकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पतसंस्थेवर डॉ.सुभाष घोंगडे यांची सुमारे पंधरा वर्षापासून एक हाती सत्ता आहे. संस्थेची झपाट्याने होणारी भरभराट, सामाजिक कार्यात अग्रेसर, गरजेच्या वेळी सभासदांच्या दुःखात सहभागी होणारी संस्था यामुळे डॉ.सुभाष घोंगडे यांनी सभासदांचा विश्वास संपादन केल्याने यंदाची निवडणूक बिनविरोध करण्यात आली. त्यात बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये डॉ.सुभाष घोंगडे, विठ्ठल बनकर, ज्ञानेश्वर माळी, विजय पालीवाल, ज्ञानेश्वर चौधरी, सुभाष माळी, भास्कर जाधव, देवानंद भोई, सुनंदा गीते, वंदना…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा पिंपळे बु. येथे दरवर्षी परसबाग तयार केली जात आहे. त्यातून सेंद्रिय भाजीपाल्याद्वारे उत्पन्न घेतले जाते. शाळेत निघणारे उष्टे अन्न कुजवुन त्याचे कंपोस्ट खत तयार केले जाते. कंपोस्ट खतांचा वापर करून परसबाग फुलविली जात आहे. सद्यस्थितीला परसबागेत वांगे, मिरची, भोपळा, शेवगा, कोथंबीर, पालक, अशा प्रकारचा भाजीपाला घेऊन विद्यार्थ्यांना सकस व सेंद्रिय अन्न पुरविण्याचा प्रयत्न आश्रमशाळेत विद्यार्थी व शिक्षकांमार्फत केला जातो. बदलत्या जीवनशैलीत जास्त उत्पन्नाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा अतिवापर भाजीपाला उत्पादनासाठी केला जातो. त्याचे होणारे दुष्परिणाम आपण सर्व जण पाहत आहोत. खतांच्या अतिवापर केल्याने बालकांच्या आरोग्यावर आणि शारीरिक विकासावर होणारे अनिष्ट परिणामांची विद्यार्थी वयातच जाणीव…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील संताजीनगरमधील रहिवासी महिलेच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीची सात ग्रॅम वजनाची सोनपोत दोन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकलवर येत लांबविल्याची घटना गेल्या १३ जानेवारी २०२४ रोजी घडली होती. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात १४ जानेवारी रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी तपास चक्रे फिरवून अकोला येथून दोघांना अटक केली. दरम्यान, दोन्ही आरोपींकडून मुक्ताईनगर आणि भुसावळ येथे दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. सविस्तर असे की, गेल्या १३ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरातील संताजीनगरमधील प्रज्ञा प्रदीप तळेले यांच्या घराच्या समोरुन त्यांच्या गळ्यातील…
साईमत, यावल : प्रतिनिधी येथील नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आता नवीन शासकीय धोरणानुसार अनेक कामे निविदा काढून मजूरांकडून ठेकेदार करून घेत आहे. ठेकेदार मात्र मजुरांना मजुरी देतांना प्रत्येक मजुराला ६०० रुपये रोज न देता फक्त अंदाजे १५० रुपये रोज देऊन मजूरांच्या पावतीवर मात्र ६०० ते ६१९ रुपये दिल्याची नोंद करून मजुराची स्वाक्षरी घेत आहेत. एखाद्या मजुराने ठेकेदाराला जाब विचारल्यास आम्हाला पेमेंट काढताना मुख्याधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त नगरपालिका व संबंधितांना विश्वासात घेतल्याशिवाय आमचे पेमेंट निघत नाही, असेही काही मजुरांना सांगितले जाते. त्यामुळे ठेकेदारीच्या माध्यमातून मजुरांच्या ‘टाळूवरील लोणी खाणारी’ यंत्रणा कार्यरत असल्याचे संपूर्ण यावल शहरात चर्चिले जात आहे. यावल नगरपालिका साठवण तलाव चालविणे व…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यासारख्या हिंदूंवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी तसेच हिंदू राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने येत्या बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कोर्टाजवळील खान्देश प्रेस मैदान येथे ‘विराट हिंदू राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन केले असल्याची माहिती सभेच्या आयोजकांनी हॉटेल श्रीनाथ प्राइड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सभेत प्रमुख वक्ता म्हणून तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्ववादी टायगर राजासिंह यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर, रणरागिणी प्रतीक्षा कोरगावकर संबोधित करतील. यावेळी सर्वश्री अनिल वानखेडे, अमृत सचदेव, राजाराम पाटील, गजेंद्र…
साईमत, पाळधी, ता. धरणगाव : वार्ताहर येथील शनीनगर भागातील वाहन चोरी प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून दोन रिक्षा आणि तीन मोटार सायकल जप्त करण्यात यश मिळविले आहे. येथील शनीनगर भागात वाहन चोरी प्रकरणी दोन जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून तीन जणांची माहिती मिळाल्याने त्यांनाही अटक केली होती. अशा पाच आरोपींकडून पाळधी पोलिसांनी दोन रिक्षा, तीन मोटार सायकल जप्त करण्यात यश मिळविले आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा भागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल कुमार सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि.उद्धव ढमाले, स.पो.नि. सचिन शिरसाठ, विठ्ठल पाटील, विजय चौधरी, अर्जुन कुवारे, प्रवीण तांदळे आदींनी केली.
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी गेल्या २०२१ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले होते. त्यांना कुठलीही शासकीय मदत मिळाली नसल्याने अखेर पीडित शेतकरी प्रांत कार्यालयाबाहेर तीन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. उपोषणस्थळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांना वाटप करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन देत उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी उपोषण तूर्त मागे घेतले आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी दिलीप बाबुराव पाटील आणि मधुकर कौतीक पाटील हे आमरण उपोषणाला बसले होते. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबाही दिला होता.तालुक्यातील अनेक भागात २०२१ मधील खरीप हंगामात अवकाळी तसेच अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाले होते. तब्बल २७ महिने उलटूनही शासनाकडून कुठलीही दखल घेतली…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण कारागिरांची विविध कार्यकारी ग्रामोद्योग संस्थेच्या चेअरमनपदी सुनील मिस्तरी तर व्हाईस चेअरमनपदी सुधाकर जाधव यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. यापैकी सलग दुसऱ्यांदा चेअरमन पदासाठी सुनील मिस्तरी यांना संधी मिळाली आहे. चेअरमन पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आला होता. तसेच व्हॉइस चेअरमन पदासाठी सुधाकर जाधव यांनी अर्ज केला होता. निवड जाहीर झाल्यानंतर सुनील मिस्तरी आणि सुधाकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित संचालकांमध्ये यशवंत सिताराम सुतार, सुरेश कैलास बोरसे, एकनाथ सुखदेव लोहार, नाना रमेश मिस्तरी, शाम संतोष बागुल, किरण गुलाब देवरे, उज्ज्वला भैयासाहेब हिरे, ज्योती बाळासाहेब मोरे यांचा समावेश आहे. निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भडगावचे…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई आणि संयोजक रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, नाशिक यांच्यातर्फे खान्देश अवयव दान जनप्रबोधन यात्रेचे चोपडा येथे नुकतेच आगमन झाले होते. यावेळी शहरात अवयवदान जनप्रबोधन प्रभातफेरी तसेच बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक याठिकाणी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत घोषणा देऊन जनजागृती केली. यानंतर एम. जी. कॉलेज येथे प्राणीशास्त्र विभागातर्फे अवयवदान जनप्रबोधन हेतूने विद्यार्थ्यांची पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. त्यात अत्यंत सुंदर, कल्पक व अभ्यासपूर्ण पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यानंंतर सभागृहात अवयवदान जनप्रबोधन यात्रेचे व्याख्याते प्रशांत पागनिस, सुधीर बागाईतदार यांनी उपस्थितांना त्वचादान, नेत्रदान, अवयवदान, देहदान यासंदर्भात माहिती दिली.…