साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीद्वारा संचालित डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयातर्फे एक नवीन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लोहारा गावात दोन दिवस चौधरी गल्ली, संत जगनाडे महाराज चौक, शिवाजीनगर, तपेश्वर नगर अशा ठिकठिकाणी कॉर्नर सभा नुकत्याच घेण्यात आल्या. सभेला विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके, पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविकात वाय.पी.वानखेडे यांनी सभेचा उद्देश, शाळेतील शिक्षकांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्या याविषयीची माहिती विद्यार्थ्यांसह पालकांना करून दिली. यावेळी आर.सी.जाधव, आर.के.खोडपे यांनीही मनोगतातून पालकांनी परीक्षा काळात मुलांकडे कशा पद्धतीने लक्ष द्यावे, कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी न घाबरता परीक्षेला निर्भीडपणे सामोरे जाऊन यश संपादन करण्याचे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले यांनी केले. तसेच जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून ‘कॉफी मुक्त परीक्षा’ अभियान राबविण्यात येत आहे. त्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांसह पालकांना देण्यात आली. शेवटी आभार व्ही.बी.इंगळे यांनी मानले.