साईमत, जामनेर : प्रतिनिधी महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या आदेशावरुन जामनेर भाजपाच्या शहर चिटणीसपदी जगदीश बाबुराव सोनार यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले. यापूर्वीपासूनच पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करत होतो. त्यापेक्षा अधिक वेळ देऊन शहरातील वार्डनिहाय पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्षा साधना महाजन, जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक आतिष झाल्टे, शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे, ना.महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: Sharad Bhalerao
साईमत, लोहारा, ता. पाचोरा : वार्ताहर पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील त्या काळी असलेल्या न्यू इंग्लिश स्कुल, लोहारा (आताच्या डॉ.जे.जी. पंडित मा. वि., लोहारा) विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३४ वर्षांनी लोहारा येथील पवित्र तीर्थक्षेत्र श्री तपेश्वर महाराज मंदिराजवळ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी १९९१ वर्षातील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी ३४ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्व मित्र, मैत्रिणी, गुरुवर्य भाऊक झाल्याचे दिसून आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक भीमराव शेळके होते. स्नेहमेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी व मित्र-मैत्रिणींनी शाळेतील गुरुजनांबाबत कृतज्ञता व्यक्त करत स्वतःचा परिचय करून मनोगत व्यक्त केली. यावेळी अ.अ.पटेल, इ.एन.सावदेकर, जी.एल. सरोदे,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील नवलभाऊ शिक्षणशास्त्र महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक, बंगलोर) केंद्रीय समितीच्यावतीने नुकतीच ‘बी’ श्रेणी प्रदान करण्यात आली. उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी तसेच महाविद्यालयाची भौतिक व गुणात्मक प्रगती व्हावी, यासाठी पाच वर्षातून एकवेळा नॅक समितीच्यावतीने महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जाते. नॅक मूल्यांकन प्रक्रिये दरम्यान नॅक बेंगलुरु यांच्यातर्फे तीन सदस्य समितीत अध्यक्ष डॉ. अंबिका दत्त शर्मा, प्रोफेसर डॉ. हरसिंग गौर विश्वविद्यालय सागर (म.प्र.), समन्वयक डॉ. सुधीर कुमार जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली, सदस्य प्राचार्य डॉ. सर्वनन थर्मलिनग्राम भारतीय कॉलेज ऑफ एज्युकेशन विलुपुरम तामिळनाडू या मूल्यांकन समितीने नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नुकतीच भेट देऊन विविध शैक्षणिक व भौतिक सुविधांची तपासणी…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर दिव्यांगांसह गरजू रुग्णांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. शासन, जिल्हा प्रशासन दिव्यांगांसाठी तसेच रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत. त्यांना कोणतीही मदत हवी असल्यास, काही अडचण असल्यास ती तात्काळ दूर करण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून आरोग्य व दिव्यांग बांधवांना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करून जीवन सुसह्य होण्यास मदत होईल. राजकारण विरहित केलेल्या आरोग्यसेवेमुळे आत्मिक समाधान प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पं.स.चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, मुकुंदराव गोसावी आणि जी.पी.एस मित्र परिवाराने आरोग्य व दिव्यांगाच्या सेवेसाठी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक करून लवकरच दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप केले जाईल.…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील गोरनाळे येथील रहिवासी, जामनेरचे माजी तालुका कृषी अधिकारी तथा सध्या पाचोरा तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांची आकाशवाणी केंद्र जळगाव येथे ‘शेतशिवार’ कार्यक्रमात ‘हवामान आधारित शेती एक काळाची गरज’ विषयावर लाईव्ह मुलाखत येत्या बुधवारी, २८ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. जामनेर तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुलाखतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रमेश जाधव यांच्यावतीने केले आहे. ते म्हणाले की, दिवसेंदिवस बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्याचा थेट परिणाम हा उत्पादन व उत्पन्नावर होत असतो. त्यातच शेतमालाचे बाजारभाव स्थिर किंवा निश्चित नसल्याकारणाने शेतमालाला योग्य दरही मिळत नाहीत. या सर्व बाबींवर मात करणे हे शेतकऱ्यांसमोर…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ब्राह्मणशेवगे ते माळशेवगे रस्त्याचे जिल्हा परिषद पंचवीस पंधरा निधी अंतर्गत डांबरीकरण करण्यात येत आहे. गेल्या एक महिन्यापासून हे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. अनेक दिवसांपासून माळशेवगे-ब्राह्मणशेवगे रस्त्यावर मोठमोठे दगड टाकून ठेवल्यामुळे बस आणि इतर वाहतूक बंद आहेे. त्यामुळे माळशेवगे येथील प्रवाशांना ३ ते ४ कि.मी. पायपीट करावी लागत आहे. अशातच ओबडधोबड दगडांवरुन माळशेवगे येथील एक महिला पडून तिला दुखापत सहन करावी लागली. तसेच गाडी पडल्यामुळे रम्हणे येथील एका दुचाकी स्वाराला डोक्याला मार लागुन जखम झाली आहे. रस्त्यावर टाकुन ठेवलेल्या खडीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी विहिरीचा ठिसुळ, मुरमाड निकृष्ठ दर्जाच्या दगडांचा वापर…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आदिवासी सेलची चोपडा तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करून त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यात महिला अध्यक्षा म्हणून आडगावच्या ग्रामपंचायत सदस्य शबाना मेहरबान तडवी, तालुका उपाध्यक्ष शरीफ तडवी, सरचिटणीस म्हणून संजय रशीद तडवी, कुंड्यापाणी संघटक सचिव म्हणून मोहरद एथील जबीर मुस्तफा तडवी, असलम मुबारक तडवी, तालुका सल्लागार म्हणून मुसीर रुबाब तडवी, कुंड्यापाणी, मुबारक अजित तडवी, बिडगाव यांची चोपडा तालुका संघटक आणि जावेद इस्माईल तडवी यांची तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी चंद्रहासभाई गुजराथी, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, डी.पी.साळुंखे, चोपडा…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय आणि जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत विद्यार्थिनीसाठी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ (संरक्षण व प्रतिबंध मनाई निवारण अधिनियम २०१३) कायद्याबाबत एक दिवसीय जाणीव जागृती कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. त्यात ‘साडी डे’ चेही आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे होते. याप्रसंगी समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, प्रमुख वक्त्या ॲड. किशोरी नेवे, सागर नेवे, महिला तक्रार निवारण समिती प्रमुख एम.टी.शिंदे, डॉ. क्रांती क्षीरसागर, आरती पाटील, चेतन बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला माजी शिक्षणमंत्री कै.ना.अक्कासो.शरदचंद्रिका सुरेश पाटील आणि संस्थापक…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सामरोद येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची झालेली विटंबना ही आम्हाला क्लेशदायक आणि निषेधार्थ आहे. त्यामुळे जामनेर तालुक्यातील अखिल भारतीय मराठा महासंघावतीने निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्यावतीने दोषींवर तात्काळ कारवाई करून अटक करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने तहसिलदारांसह पोलीस निरीक्षकांना नुकतेच देण्यात आले. दरम्यान, तालुक्यात सर्वात मोठा मराठा समाज असल्याने गावागावात जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात यावा, असेही निवेदनात नमूद केले आहे. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अतुल सोनवणे, तालुकाध्यक्ष आकाश बंडे,…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर, पुनगाव रोड येथे निर्मल इंटरनॅशनल स्कुलमधील पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी शाळेच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त ‘निर्मल उत्सव’ उत्साहात सादर केला. सुरुवातीला संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी, उपाध्यक्षा कमल पाटील, सचिव नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. तसेच सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारामुळे उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला होता. चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्यामुळे सर्व वातावरण आनंदीमय झाले होते. संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी यांनी मनोगतात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी नैतिक मूल्ये, संस्कार किती महत्वाचे आहेत, यासाठी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर लहान…