निर्मल इंटरनॅशनल स्कुलला ‘निर्मल उत्सव’ उत्साहात

0
1

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

येथील तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर, पुनगाव रोड येथे निर्मल इंटरनॅशनल स्कुलमधील पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी शाळेच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त ‘निर्मल उत्सव’ उत्साहात सादर केला. सुरुवातीला संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी, उपाध्यक्षा कमल पाटील, सचिव नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. तसेच सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून गणेश वंदनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारामुळे उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला होता. चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्यामुळे सर्व वातावरण आनंदीमय झाले होते.

संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी यांनी मनोगतात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी नैतिक मूल्ये, संस्कार किती महत्वाचे आहेत, यासाठी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर लहान मुलांच्या भावविश्‍वाला आकार देतांना पालकांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे, असे नमूद केले.

यावेळी निर्मल सिड्सचे सर्व पदाधिकरी, शाळेचे प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदीप सोनवणे, समन्वयक स्नेहल पाटील, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी पूर्व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here