रा.काँ. शरद पवार गटाची आदिवासी सेलची तालुका कार्यकारिणी जाहीर

0
11

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या निवासस्थानी त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आदिवासी सेलची चोपडा तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करून त्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यात महिला अध्यक्षा म्हणून आडगावच्या ग्रामपंचायत सदस्य शबाना मेहरबान तडवी, तालुका उपाध्यक्ष शरीफ तडवी, सरचिटणीस म्हणून संजय रशीद तडवी, कुंड्यापाणी संघटक सचिव म्हणून मोहरद एथील जबीर मुस्तफा तडवी, असलम मुबारक तडवी, तालुका सल्लागार म्हणून मुसीर रुबाब तडवी, कुंड्यापाणी, मुबारक अजित तडवी, बिडगाव यांची चोपडा तालुका संघटक आणि जावेद इस्माईल तडवी यांची तालुका संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

यावेळी चंद्रहासभाई गुजराथी, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, डी.पी.साळुंखे, चोपडा तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, श्री.देवरे, डॉ.रुस्तम तडवी, मेहरबानभाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी अरुणभाई गुजराथी यांनी जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी हे चांगले काम करीत असल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. उर्वरित नियुक्त्या येत्या आठ दिवसात केल्या जातील, असे ठोस आश्‍वासन जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here