साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील डॉ.जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक ए.ए.पटेल यांच्या संकल्पनेतून मुलांना मराठी भाषेचे महत्त्व कळावे, यासाठी व खान्देशमधील कवींची ओळख व्हावी, यासाठी शाळेत विविध कवी यांच्या कविता, त्यांचे लेख व छायाचित्र यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष विश्वास पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी राज्य साहित्य संमेलन पुरस्कार प्राप्त तथा ‘पांगल्या पायवाटा’ प्रसिद्ध कविता संग्रहाचे कवी टी.जे.पाटील (माजी अभियंता), ए.ए.पटेल होते. व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापिका सौ.यु.डी.शेळके, पर्यवेक्षक पी.एम.सुर्वे होते. मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सादर केले. त्याचबरोबर विद्यालयातील उपशिक्षक श्री.इंगळे…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांना दुष्काळाच्या कवडीचाही फायदा झालेला नाही. मन्याड धरणाच्या पाण्यावर शेतकरी अवलंबून आहे. त्यामुळेे गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून गिरणा धरणातून मन्याड धरणात पाणी टाकून शेतकऱ्यांना शेतीसाठी व गुरांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मन्याड धरण परिसरातील शेतकऱ्यांनी चाळीसगावच्या तहसिलदारांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास शिरसगाव येथील शेतकरी दिलीप पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. शासनाने दुष्काळाच्या सर्व सुविधा शेतकऱ्यांना देण्यात याव्यात तर मन्याड धरण्याच्या पाण्यावर शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मन्याड धरण परिसरात पर्जन्यमान चांगले होत नसल्यामुळे मन्याड धरण भरत नसल्यामुळे गिरणा मन्याड नदी जोड…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील सर्व गावांमध्ये रविवारी, ३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी १९५ बूथ तसेच १९ मोबाईल टीम, बाजार, एसटी स्टँड व नाके याठिकाणी नऊ ट्रांजिट टीमद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम तालुक्यातील सर्व गाव, पाडे, दुर्गम भाग, शेत शिवार व वीटभट्टी अशा सर्व ठिकाणी राबविण्यात येणार आहे. मोहिमेत चोपडा तालुक्यातील ३१ हजार ८३९ शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग, महिला…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात १, २ आणि ३ मार्च २०२४ रोजी श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. विशेष म्हणजे विश्वात कोठेही नसतील अशा आकाराची मंदिरे मंगळग्रह मंदिर परिसरात उभारली गेली आहेत. त्यामुळे अमळनेर शहराच्या सौंदर्यात व वैशिष्ट्यात आणखी भर पडली आहे. १ मार्च रोजी सकाळी प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, देवता स्थापन तर दुपारी ते सायंकाळी अग्नी स्थापन, जलाधीवास, ग्रह स्थापन, ग्रहयज्ञ, सायंपूजा, आरती करण्यात आली. तसेच शनिवारी, २ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता प्रात:…
साईमत, फैजपूर : प्रतिनिधी जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, अनिष्ट रूढी, परंपरेचा अवलंब करून आपणच आपल्या संस्कृतीचा ऱ्हास करतो आहे. त्यामुळे आगामी काळात संस्कृतीचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी संतांनी समाजासाठी प्रबोधन करावे, असा ठराव देवगिरी प्रांत मराठवाडा व खान्देश मिळून १६ जिल्ह्यातून आलेल्या २५० संत-महंतांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगिरी प्रांत यांच्या पुढाकाराने निसर्गरम्य अशा श्री निष्कलंक धाम, वढोदा (फैजपूर) येथे दोन दिवसीय झालेल्या संत संमेलनात अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, अखिल भारतीय संत समितीचे राज्याध्यक्ष प.पू. गोपाल चैतन्यजी महाराज, रा.स्व. संघ पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, धर्म जागरण पश्चिम क्षेत्र प्रमुख महेंद्र…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील श्री स्वामी समर्थ केंद्राला राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून ४० लाख रुपये खर्चून भव्य सभामंडप होणार आहे. त्याच्या खोदकाम आणि बांधकाम कार्याचा प्रारंभ गुरुवारी २९ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आणि कैलास चौधरी यांनी पाठपुरावा केला होता. लोहारा गावात होत असलेल्या विकास कामांमुळे गावातील नागरिकांसह सेवेकऱ्यांनी ना.गिरीष महाजन यांचे आभार मानले आहे. यावेळी ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. यावेळी रामचंद्र काळे, दिनकर बेलदार, सुनील पाटील, गोटू पालीवाल, आनंदा धोनी, सुधाकर शिंपी, सुधाकर विसपुते, बाळू शिंपी, नाना बेलदार, ज्ञानेश्वर सरोदे, प्रभाकर चौधरी, अखिलेश पालीवाल, अंकित…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी नोबेल पुरस्कार प्राप्त, भारतरत्न डॉ. सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता पाटील, विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक समाधान पाटील, प्रमोद पाटील, विष्णू हुसे, कांचन पाटील, शाळा समन्वयक डी. एस. पाटील, मुख्याध्यापिका ममता न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल, दिप्ती पाटील, अश्विनी पाटील, सुचिता पाटील, दीपाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. खगोलशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांसारख्या विविध शास्त्रांतील ज्ञानावर आधारित प्रतिकृती विद्यार्थ्यांनी…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यात येत्या रविवारी, ३ मार्च रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिओ टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी तहसीलदार नानासाहेब आगळे होते. प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालय जामनेरचे कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय पहूरचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचे प्लस पोलिओ मोहिमेचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण करण्यात आले. जामनेर शहरात १९ तर ग्रामीण भागात २०७ पोलिओ केंद्र अश्या २२६ पोलिओ केंद्रावर एकाच दिवशी तालुक्यातील ३७ हजार २२९ बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजण्यात येणार आहे. यासाठी ६२६ सदस्यांची नेमणूक केली आहे. ४३ पर्यवेक्षक हे…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांची उन्नती म्हणजे समाज आणि राष्ट्राची उन्नती होय. विद्यार्थी शाळेत फक्त शिकून आणि टिकून उपयोग नाही तर तो देशाचा आदर्श नागरिक आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून उदयास आला पाहिजे. हाच शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा उद्देश आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेमार्फत अमळनेर येथील प्रताप हायस्कुलमध्ये २६ ते २८ दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले गेले पाहिजे. सामाजिक मूल्ये, पर्यावरणपूरक, व्यावसायिक शिक्षण दिले गेले पाहिजे, यासाठी शिक्षकांना नवनवीन तंत्रज्ञान…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.पी.आर्टस, एस.एम.ए. सायन्स अँड के. के.सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर. कोतकर ज्युनिअर कॉलेज येथे मराठी विभागात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.के. एस. खापर्डे, विद्यार्थी उपस्थित होते. मराठी भाषेची जडणघडण, विकास व प्रचार, प्रसार यासंदर्भाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना आपण मराठी भाषिक म्हणून मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे, असे आवाहन डॉ. एम. व्ही. बिल्दीकर यांनी केले. प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख डॉ. आर.एन. चंदनशिव यांनी मराठी…