अमळनेरला मंगळग्रह मंदिरात प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यास प्रारंभ

0
2

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात १, २ आणि ३ मार्च २०२४ रोजी श्री कालभैरव, श्री भैरवीमाता, श्री दत्तगुरू व श्री अनघामाता या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. विशेष म्हणजे विश्‍वात कोठेही नसतील अशा आकाराची मंदिरे मंगळग्रह मंदिर परिसरात उभारली गेली आहेत. त्यामुळे अमळनेर शहराच्या सौंदर्यात व वैशिष्ट्यात आणखी भर पडली आहे.

१ मार्च रोजी सकाळी प्रधान संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदीश्राद्ध, देवता स्थापन तर दुपारी ते सायंकाळी अग्नी स्थापन, जलाधीवास, ग्रह स्थापन, ग्रहयज्ञ, सायंपूजा, आरती करण्यात आली. तसेच शनिवारी, २ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजता प्रात: पूजन, जलयात्रा, वास्तुशांती शांतीक पौष्टिक हवन तर दुपारी २ ते सायं. ६ वाजता मुख्य देवता हवन, मंदिर व मूर्ती स्थापन, तत्त्वन्यास, धान्यादीवास, शय्याधीवास, सायंपूजा होणार आहे.

सोहळ्यात दोन सत्रात पूजा होणार आहे. प्रत्येकी सत्रात विविध क्षेत्रातील ११ मान्यवर सपत्नीक विविध पुजांचे मानकरी आहेत. त्या अनुषंगाने मंदिर परिसर केळीचे खांब, आंब्यांच्या पानांची तोरणे, भगवे ध्वज, पताका, विविध फुले व माळा या आदींच्या माध्यमातून सजला आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय, चैतन्यमय व मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. भाविकांनी सोहळ्याचे साक्षीदार होऊन दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here