लोहाऱ्यातील स्वामी समर्थ केंद्राला ४० लाख रुपये खर्चून होणार सभामंडप

0
3

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील श्री स्वामी समर्थ केंद्राला राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून ४० लाख रुपये खर्चून भव्य सभामंडप होणार आहे. त्याच्या खोदकाम आणि बांधकाम कार्याचा प्रारंभ गुरुवारी २९ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरांच्या हस्ते करण्यात आला. यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आणि कैलास चौधरी यांनी पाठपुरावा केला होता. लोहारा गावात होत असलेल्या विकास कामांमुळे गावातील नागरिकांसह सेवेकऱ्यांनी ना.गिरीष महाजन यांचे आभार मानले आहे. यावेळी ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.

यावेळी रामचंद्र काळे, दिनकर बेलदार, सुनील पाटील, गोटू पालीवाल, आनंदा धोनी, सुधाकर शिंपी, सुधाकर विसपुते, बाळू शिंपी, नाना बेलदार, ज्ञानेश्‍वर सरोदे, प्रभाकर चौधरी, अखिलेश पालीवाल, अंकित चौधरी, बाळू सरोदे, गौरव शिंपी, गजानन शिंदे, राहुल माळी, राहुल शेळके, आशा काळे, शोभा बेलदार, निशा शिंपी, भिकुबाई चौधरी, सुरेखा गोसावी, सुशीला क्षीरसागर, प्राजक्ता क्षीरसागर, मनीषा चौधरी, छाया पांडे, सुशीला मोरे, चंदाबाई बेलदार, पल्लवी शिंपी, श्रीमती धोनी, ज्योती बेलदार, निर्मला शिंपी, ज्योती गोसावी, मंगला कासार, रेखा पाटील, जयश्री पालीवाल, विमल कासार, मंदा सुर्वे यांच्यासह लोहारा गावातील सर्व नागरिक, सेवेकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here