साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी ज्या शाळेत आपण शिकलो…खेळलो… बागडलो… लहानाचे मोठे झालो. त्या शाळेत आपला नागरी सत्कार करण्यात आला. त्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजत आहोत. अशा सत्कारामुळे आपल्याला अधिक काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन अयोध्या जय श्रीराम मंदिराच्या बांधकामाचे व्यवस्थापन करणारे आणि चाळीसगाव तालुक्यातील मुळचे रहिवासी शाळेतील १९८५ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी सतीश साहेबराव चव्हाण यांनी केले. अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीचे काम एल अँड टी बांधकाम व्यवसाय कंपनीकडून केले आहे. या कंपनीमार्फत प्रकल्प व्यवस्था म्हणून सतीश चव्हाण यांनी राम मंदिराच्या बांधकामात फार मोठे योगदान दिले आहे आणि देत आहे. योगदानाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथील हितगुज मित्रमंडळाच्यावतीने हायस्कुलच्या प्रांगणात सतीश चव्हाण…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून आ.मंगेश चव्हाण यांनी आपल्या विकासकामांचा झंझावात सुरूच ठेवला आहे. अनेक आवश्यक असणारी विकासकामे मंजूर करून आणत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यावश्यक असणाऱ्या भव्य व अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त कृषी भवन बांधकामासाठी ११ कोटी ६९ लाखांचा निधी त्यांनी मंजूर करून आणला आहे. याबाबत शासन निर्णय नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, चार मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका बीजगुणन केंद्र यांचे कार्यालय एका छताखाली येणार आहे. कृषी भवन मंजूर केल्याबद्दल आ.मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कृषी…
साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील वाघळुद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत रंगतरंग वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचे सादरीकरण केल्याने पालक वर्गांमध्ये कौतुक करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी भर द्यावा, अशा प्रकारची माहिती उपस्थितांनी दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक चौधरी, शेतकी संघाचे व्हा. चेअरमन तेजस धनंजय पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय बोरोले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद सपकाळे, ग.स.सोसायटीचे संचालक योगेश इंगळे, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदीप सोनवणे, कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान जाधव, संजय ताडेकर, कमलेश नेहेते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते थोर पुरुषांचे व…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव-करगाव रस्त्यावरील नवीन रेल्वे बोगदा अरुंद आहे. त्यामुळे तिसरा रेल्वे लाईनच्या कामानंतरही करगाव रस्त्यावरील रेल्वे बोगद्याची समस्या कायम आहे. या समस्येवर तोडगा न निघाल्यास राष्ट्रीय जनमंच पक्ष मनसेतर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. त्यात राष्ट्रीय जनमंच पक्ष, मनसेचे पदाधिकारी, वामन नगर येथील नागरिक यांचे शिष्टमंडळ आणि रेल्वे अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. रेल्वे लाईन खालून तयार केलेला बोगदा नसून एक नाल्यासारखाच प्रकार आहे. बैठकीत समाधानकारक चर्चा झाली आणि जो बोगदा आहे तो तिथून जाण्यास नागरिकांना त्रास होत आहे. त्या बोगद्यातील माती खालच्या स्तरावर आणून रिक्षा, मोटरसायकल व्यवस्थितरित्या पास होतील आणि वाहतूक सुरळीत…
साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर संपूर्ण खान्देशात आदिवासी बांधवाना अतिशय आनंद देणारा आवडणारा सण म्हणजे ‘भोंगऱ्या’ आहे. वर्षभर काबाड कष्ट करुन भोंगऱ्या सणानिमित्त जळगाव, धुळे, नंदुरबार ह्या तीन जिल्ह्यातील आदिवासी बांधव या सणानिमित्त एकत्र येतात. वाड्या-वस्त्यांवर तरुण-तरुणीसह आबाद वृध्द ढोल-ताशांच्या तालावर, बासरीच्या सुरांनी धुंद होऊन ‘भोंगऱ्या आया रे भाया, चालु, चालू रे भोंगऱ्या देखांन चालु’, अशी लोकगीते सादर करतात आणि भोंगऱ्या सणाचा मनमुराद आनंद लुटतात. अशा खान्देशी, आदिवासी बांधवाच्या ‘भोंगऱ्या’ सणास सोमवारी, १८ मार्चपासून प्रारंभ होत आहे. आदिवासी पावरा बांधवाना सर्वांत आवडता व मन उत्साहात करणारा सण म्हणजे ‘भोंगऱ्या’ आहे. दिवाळीला जेवढे महत्त्व असते, तेवढेच आदिवासी बांधवामध्ये ‘भोंगऱ्या’ सणास…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी शहरातील कत्तलखाना आणि गोहत्या बंद व्हावी, अशा मागणीसाठी बोदवड येथे गेेल्या नऊ दिवसांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष संजय शर्मा (धुळे) हे तहसील कार्यालयाच्या परिसरात उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे तहसिलदारांनी प्रशासनाला आदेश दिले आहे. परंतु उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत संबंधितांवर कार्यवाही होत नाही, तोपर्यंत उपचार घेणार नसल्याचे सांगितले. तीन दिवसांपूर्वी गोसेवकांचा गोहत्या बंदीसाठी मुख्याधिकारी कार्यालावर मोर्चा नेण्यात आला होता. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्याशी संपर्क साधल्यावर ज्या ओट्यावर मास विक्री होते. ते ओटे पाडण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले. कार्यवाही करण्यास सुरु केली असून संबंधितांवर कार्यवाही होणार असल्याचे सांगितले. संजय शर्मा यांच्या उपोषणाला शेकडो…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविल्या गेलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात शाळेने १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ अशा ४५ दिवसात विद्यार्थी केंद्रित आणि प्रत्यक्ष सहभागातून शैक्षणिक, शारीरिक, सांस्कृतिक, बौद्धिक, आरोग्य विषयक, पर्यावरण पूरक, आर्थिक साक्षरता, राष्ट्रप्रेम, क्षेत्रभेट आदी उपक्रम राबविले. अभियानात मलकापूर तालुक्यातून मलकापूर लोकसेवा शिक्षण बहुउद्देशिय मंडळाद्वारा संचलित नूतन विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेने यशस्वीपणे राबविलेल्या उपक्रमांमुळे शाळेला बुलढाणा येथे झालेल्या गौरव पुरस्कार समारंभात धीरज लिंगाडे विधान परिषद सदस्य, संजय गायकवाड विधानसभा सदस्य बुलढाणा, श्वेता महाले विधानसभा सदस्य चिखली, विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, डॉ. जे. ओ.भटकर प्राचार्य जिल्हा…
साईमत, रावेर : प्रतिनिधी सातपुडा पर्वतातील पाल वनक्षेत्रातून अंजन वृक्षाचा पाला बेकायदेशीररित्या तोडून चारचाकी पिकअप भरताना एक जण आढळून आला. त्यामुळे पिकअपसह मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे. पिकअप आणि अंजनच्या पाल्यासह त्याची किंमत तीन लाख २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पालचे वन कर्मचारी नियतक्षेत्र पालमधील वनक्षेत्रात शनिवारी, १६ मार्च रोजी सकाळी गस्त करीत असताना आरोपी अक्षय नाथु डावर (रा.मध्य प्रदेश) याला क.नं.५५ मध्ये अंजनचा पाला तोडून पिकअपमध्ये भरताना रंगेहात पकडला. पीकअप (क्र. एमपी १० जी०५७०) पिकअपसह अंजनचा पाला ताब्यात घेतला आहे. यानंतर आरोपीची चौकशी करण्यात आली. ही कारवाई यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, वनक्षेत्रपाल…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी प्रत्येक नागरिकांनी ग्राहक म्हणून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. तसेच सेवा देण्याची वृत्ती नोकरात असली पाहिजे, असे मत तालुका कृषी अधिकारी सी.जे.पाडवी यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बोदवड तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी पुरवठा तपासणी अधिकारी एम.एफ.तडवी होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलन करून झाली. यावेळी ग्राहक म्हणून गणेश पाटील, वराड यांनीही मनोगतात ग्राहक दिन नुसता केवळ फोटो सेशनपुरता साजरा करू नये. ग्रामपंचायतमध्येही ग्राहक दिन ग्राहक पंधरवडा साजरा केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. वीज महावितरणच्या सौ.जाधव यांनी महावितरणबाबत तक्रार कुठे करायची. तसेच वेळेत वीज बिल भरल्यास होणारे फायदे याबाबत महावितरणच्या विविध…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वडगाव नालबंदी येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते मोरसिंग दलु राठोड यांनी सामाजिक जीवनात केलेल्या कार्यामुळे तळागाळातील वंचित समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाज भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार नॅशनल सेंटर फॉर पर फर्मिंग आर्ट्स, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी अखिल भारतीय बंजारा सेनेचे अध्यक्ष कांतीलाल नायक उपस्थित होते. मोरसिंग राठोड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातून सर्वत्र…