नागरी सत्कारामुळे अधिक काम करण्याची मिळते प्रेरणा

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

ज्या शाळेत आपण शिकलो…खेळलो… बागडलो… लहानाचे मोठे झालो. त्या शाळेत आपला नागरी सत्कार करण्यात आला. त्यामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजत आहोत. अशा सत्कारामुळे आपल्याला अधिक काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन अयोध्या जय श्रीराम मंदिराच्या बांधकामाचे व्यवस्थापन करणारे आणि चाळीसगाव तालुक्यातील मुळचे रहिवासी शाळेतील १९८५ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी सतीश साहेबराव चव्हाण यांनी केले.

अयोध्यातील राम मंदिराच्या उभारणीचे काम एल अँड टी बांधकाम व्यवसाय कंपनीकडून केले आहे. या कंपनीमार्फत प्रकल्प व्यवस्था म्हणून सतीश चव्हाण यांनी राम मंदिराच्या बांधकामात फार मोठे योगदान दिले आहे आणि देत आहे. योगदानाच्या पार्श्‍वभूमीवर चाळीसगाव येथील हितगुज मित्रमंडळाच्यावतीने हायस्कुलच्या प्रांगणात सतीश चव्हाण यांना त्यांच्या १९८५ च्या शाळेच्या इयत्ता दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी नागरी सत्काराचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर, सतीश चव्हाण यांचे आई-वडील आणि पाचोरा येथील त्यांचे मित्र सुनील सराफ उपस्थित होते. प्रास्ताविकात सतीश चव्हाण यांचे मित्र संजय पवार यांनी नागरी सत्काराची भूमिका स्पष्ट केली. तसेच सुनील सराफ यांनी राम मंदिर उभारणीचा इतिहास त्यासंदर्भात झालेला संघर्षाची माहिती दिली.

याप्रसंगी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्यावतीने मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायण अग्रवाल यांच्या हस्ते सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर.सी. पाटील, सचिव डॉ.विनोद कोतकर, संचालक डॉ.सुनील राजपूत, ॲड. प्रदीप अहिरराव, भूषण ब्राह्मण यांच्यासह मिलिंद देव आणि ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर आदी उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी प्रशांत जोगळेकर, कैलास सूर्यवंशी, राकेश नेवे, वैभव कोतकर, दीपक व खारे, प्रमोद मेहता, आबा चव्हाण, दीपक शिरोळे, बापू वानखेडे, सुनील दर्प, नंदू फौजी, डॉ.दत्ता भदाणे, मोहन राठोड, सूरज अग्रवाल, पप्पू देशमुख, रामभाऊ येवले, नरेंद्र सुराणा, नितीन सराफ, राजेश छाजेड, भूषण परदेशी, मनीष जयंती, चेतन परदेशी, संजय दुबे, विनोद परदेशी, संजय मिस्तरी, संजय सोनार, पंकज बडे, प्रशांत वैद्य, सुभाष नेरकर, संगीता भालेराव, रणजित राजपूत, रवी शेटे यांच्यासह हितगुज मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here