अंजन वृक्षांच्या पाल्याची बेकायदा वाहतूक

0
4

साईमत, रावेर : प्रतिनिधी

सातपुडा पर्वतातील पाल वनक्षेत्रातून अंजन वृक्षाचा पाला बेकायदेशीररित्या तोडून चारचाकी पिकअप भरताना एक जण आढळून आला. त्यामुळे पिकअपसह मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे. पिकअप आणि अंजनच्या पाल्यासह त्याची किंमत तीन लाख २१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पालचे वन कर्मचारी नियतक्षेत्र पालमधील वनक्षेत्रात शनिवारी, १६ मार्च रोजी सकाळी गस्त करीत असताना आरोपी अक्षय नाथु डावर (रा.मध्य प्रदेश) याला क.नं.५५ मध्ये अंजनचा पाला तोडून पिकअपमध्ये भरताना रंगेहात पकडला. पीकअप (क्र. एमपी १० जी०५७०) पिकअपसह अंजनचा पाला ताब्यात घेतला आहे. यानंतर आरोपीची चौकशी करण्यात आली.

ही कारवाई यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालचे वनपाल डी.जी.रायसिंग, वनपाल एम.एम. तडवी, गारखेडाचे वनरक्षक श्रीमती एस. बी. वाघ यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here