साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर ना डीजे…ना बँड… कीर्तन श्रवणातून ‘शुभमंगल’ पार पडल्याने हा विवाहसोहळा समाजाला दिशा देणारा ठरला आहे. जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरात विवाहसोहळा नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख उपस्थिती जामनेरच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन, शेंदुर्णीचे गोविंद अग्रवाल यांच्यासह राज्यातून ६० ते ७० कीर्तनकार महाराज उपस्थित होते. आगळ्यावेगळ्या ठरलेल्या विवाहसोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जामनेर तालुक्यातील नाचणखेडा गावचे भगवान पुंडलिक चौधरी यांचा चिरंजीव युवा कीर्तनकार ह.भ.प.अविनाश महाराज चौधरी (माजी विद्यार्थी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची) आणि जामनेर तालुक्यातीलच रोटवदचे ईश्वर श्रावण सोन्ने यांची ज्येष्ठ कन्या जयश्री यांचा विवाहसोहळा आगळावेगळा आणि…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जामनेर : प्रतिनिधी राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी जामनेर तालुक्यातील नेरी येथील राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व किशोर खोडपे यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना राज्य सचिव रमेश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी रा.काँ.चे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष आशिष दामोदर, युवक तालुकाध्यक्ष रुपेश पाटील, हृषिकेश पाटील उपस्थित होते. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाचे विचार जिल्ह्याभरात पोहचविण्यासाठी खूप मेहनत घेणार आहे. पक्ष संघटना मजबूत रीतीने बांधण्याची ग्वाही किशोर खोडपे यांनी त्यांच्या निवडीनंतर दिली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे पक्षांचे ज्येष्ठ नेते दिगंबर पाटील, प्रमोद पाटील, डॉ. मनोहर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जामनेर विधानसभा मतदारसंघातील ३२९ मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार मित्र व मतदार सखी यांची नेमणूक केली आहे. यासंदर्भात जामनेर येथील पंचायत समितीच्या कार्यालयात संबंधित मतदार मित्र आणि मतदार सखी यांच्यासाठी नुकतीच प्रशिक्षणासह आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, तहसीलदार नानासाहेब आगळे, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांची प्रमुख उपस्थिती होती. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी केंद्रनिहाय उत्स्फूर्त स्वयंसेवक यांना मतदार मित्र तर महिला मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी संबंधित मतदान केंद्रावरील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, महिला पोलीस पाटील, महिला…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे नाकाबंदी लावण्यात आली आहे. अशातच शनिवारी, २३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास वाहनांची तपासणी सुरु होती. त्यावेळी चाळीसगाव शहरातून खडकी गावाच्या दिशेने जाणाऱ्या मारुती व्हॅनला थांबविले. त्यात देशी-विदेशी मद्य आणि बियरच्या बाटल्या खोक्यात आढळून आल्या. पोलिसांनी कारवाईत वाहनासह ५ लाख १८ हजार ४६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेडी यांच्या आदेशान्वये चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनपर सुचनेनुसार चाळीसगाव-नांदगाव…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी येथील शीलरत्न बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभेची जळगाव जिल्हा पूर्वची नुकतीच बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्षा प्रियंका अहिरे होत्या. बैठकीत तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन तालुकाध्यक्षपदी शोभा सुरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीला जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, जिल्हा संघटक ठाकूर, वनमाला हिवाळे, कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव, कल्पना तायडे, जिल्हा प्रचार व पर्यटन सचिव वसंत लोखंडे, लेफ्ट कर्नल युवराज नरवाडे, समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष रमेश साळवे, जिल्हा संघटक प्रकाश सरदार, सुषमा इंगळे, छाया सुरवाडे, रंजना ठाकरे, भुसावळ तालुकाध्यक्ष उत्तम सुरवाडे, सरचिटणीस अरुण तायडे, कोषाध्यक्ष श्रावण साळुंके, तालुका उपाध्यक्ष प्रवीण डांगे, पांडव बाबा, केंद्रीय शिक्षिका सुमित्रा सर्वटकर, सीमा…
साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यात डोंगरकठोरा शिवारात सातपुडा जंगलातील धावडा जातीचा ३४ किलो डिंक अवैध वाहतूक करताना आढळून येऊन कारवाईचा देखावा झाला. मात्र, आरोपी फरार झाल्याची घटना शनिवारी, २३ मार्च रोजी यावल पूर्व वन क्षेत्रात घडली. त्यामुळे जळगाव येथे मुख्यालय असलेल्या यावल वन विभाग कार्यक्षेत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. डोंगरकठोरा शिवारात ‘जंगल मे मंगल’मधील नाट्य घडले आहे. दरम्यान, वनविभागाच्या कारवाईत वन विभागाने पकडलेल्या ३४ किलो धावडा जातीचा डिंकाची किंमत सात हजार रुपये आहे. तसेच एक दुचाकी मोटर सायकलची किंमत बाजारभावाप्रमाणे १७ हजार रुपये आहे. वन विभागाच्या कारवाईत जप्त वाहनासह मुद्देमालाची किंमत सुमारे २५ हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात…
साईमत, यावल : प्रतिनिधी यावल नगरपरिषद मालकीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात आणि ठेकेदाराच्या उद्योगात घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरण पाहिजे त्या अटी शर्तीनुसार, नियमानुसार केले जात नसल्याने तसेच प्रकल्पात बालमजूर काम करतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याठिकाणी बालमजूर तथा लहान बालके गोट्यांचा खेळ कोणाच्या परवानगीने खेळतात, हा कायदेशीर मुद्दा उपस्थित होत आहे, असा भोंगळ कारभार असताना यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि कचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रमुख खुर्चीवर बसून ठेकेदाराला बीले का काढून देतात? असा प्रश्न संपूर्ण यावल शहरात नागरिक, ठेकेदारांमधून उपस्थित केला जात आहे. यावल नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात प्रत्यक्ष पाहणी केल्यावर यावल शहरातून संकलित केलेला ओला व…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर धरणगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.व्ही.डी.पाटील यांनी धरणगाव येथील निवडणूक आचारसंहिता अंमलबजावणी अधिकाऱ्यांची शनिवारी, २३ मार्च रोजी भेट घेऊन पंतप्रधान विश्वकर्मा योजनेबद्दल निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याबद्दल तक्रार दाखल केली. त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सलिम बेलदारही उपस्थित होते. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू केली आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतांना जनतेकडून सेतू सुविधा केंद्रावरून या योजनेअंतर्गत अवजारे खरेदीसाठीच्या नावाने पंधरा हजार रुपये मिळण्यासाठीचे अर्ज भरून घेतले जात आहेत. सरकारकडून पंधरा हजार रुपये मिळणार या आशेने जनतेने गावागावात सेतू सुविधा केंद्रावर…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी लोकसभेच्या जळगाव मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी शनिवारी, 23 मार्च रोजी अमळनेर तालुक्यात कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या भेटी घेतल्या. अमळनेर वकील संघाने त्यांना शुभेच्छा दिल्या. स्मिता वाघ यांचे ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात, फुलांच्या पाकळ्या उधळत उत्साहात स्वागत करण्यात आले. लोकसभेच्या जळगाव मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांच्या भेटी घेतल्या. अमळनेर तालुक्यातील शिरूड, जवखेडा, पिंपळे येथील गुरुदेवदत्त मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. हे दत्त मंदिर निर्गुण निराकार आहे. या मंदिराची स्थापना शके 1441 मध्ये झाली आहे. मध्वमूनी महाराज यांच्या गादीचे त्यांनी दर्शन घेतले. जवखेडा, पिंप्री, पारोळा ढेकु, वाडी शिरपूर याठिकाणी महाराजांची…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथे रोटरी क्लब ऑफ चाळीसगावतर्फे गरजू १९८ रुग्णांची तपासणी करून १०२ रुग्णांची प्लास्टिक, हँड आणि कॉस्मेटिक शस्त्रक्रिया (सर्जरी) करण्यात आली. शिबिरासाठी मुंबईतील शेठ रायचंद हंसराज धरमशी परिवार यांनी सढळ हाताने दातृत्वाची भूमिका केल्याने गरजूंना शस्त्रक्रियेचा लाभ घेता आला. गेल्या २१ वर्षापासून गरजू रुग्णांसाठी रोटरी क्लबचे असे सेवाभावी काम अविरत सुरू आहे. गरजू रुग्णांसाठी नुकताच २२ वा कॅम्प घेण्यात आला. शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून हेमांग धरमशी, तिलेश मैशेरी, मुंबई, प्रशांत पटेल, राहुल पटेल परिवार, डॉ.पंकज जिंदाल, डॉ.शंकर सुब्रमण्यम, डॉ.सागर गुंडेवार, डॉ.नोवेल ब्रीटो, डॉ.आनंद दुग्गड, रोटरी क्लबचे अध्यक्ष ब्रिजेश पाटील, सचिव चंद्रेश लोढाया, प्रकल्प प्रमुख मेडिकल डायरेक्टर डॉ.उज्ज्वला…