साईमत, भुसावळ : प्रतिनिधी
येथील शीलरत्न बुद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभेची जळगाव जिल्हा पूर्वची नुकतीच बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्षा प्रियंका अहिरे होत्या. बैठकीत तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन तालुकाध्यक्षपदी शोभा सुरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली.
बैठकीला जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, जिल्हा संघटक ठाकूर, वनमाला हिवाळे, कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव, कल्पना तायडे, जिल्हा प्रचार व पर्यटन सचिव वसंत लोखंडे, लेफ्ट कर्नल युवराज नरवाडे, समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष रमेश साळवे, जिल्हा संघटक प्रकाश सरदार, सुषमा इंगळे, छाया सुरवाडे, रंजना ठाकरे, भुसावळ तालुकाध्यक्ष उत्तम सुरवाडे, सरचिटणीस अरुण तायडे, कोषाध्यक्ष श्रावण साळुंके, तालुका उपाध्यक्ष प्रवीण डांगे, पांडव बाबा, केंद्रीय शिक्षिका सुमित्रा सर्वटकर, सीमा अहिरे उपस्थित होते.
भुसावळ तालुक्याच्या उर्वरित कार्यकारिणीत सरचिटणीस संगीता बोलके, कोषाध्यक्ष पूनम प्रधान, उपाध्यक्ष संरक्षण सुनंदा साळवे, उपाध्यक्ष पर्यटन प्रचार सविता धुरंधर, उपाध्यक्ष संस्कार सुकेसनी सर्वतकर, हिशोब तपासणीस पल्लवी खंडारे, कार्यालयीन सचिव वृषाली इंगळे, सचिव संस्कार मंगला तायडे, विद्या सुरवाडे, सुनीता मोरे, प्रतिभा सुरवाडे, अर्चना वानखेडे, मंदा धंधरे, संघटक लीलाबाई तायडे, मनीषा वानखेडे, कल्पना पांडव, रुपाली गवई, वैजानता कदम, मीना सुरवाडे, बबिता सुरवाडे यांचा निवडीत समावेश आहे. यशस्वीतेसाठी उत्तम सुरवाडे, अरुण तायडे, प्रवीण डांगे, पांडव बाबा यांनी परिश्रम घेतले.