चाळीसगावला वाहनातून मद्याची अवैध वाहतूक करणारा चालक ताब्यात

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे नाकाबंदी लावण्यात आली आहे. अशातच शनिवारी, २३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास वाहनांची तपासणी सुरु होती. त्यावेळी चाळीसगाव शहरातून खडकी गावाच्या दिशेने जाणाऱ्या मारुती व्हॅनला थांबविले. त्यात देशी-विदेशी मद्य आणि बियरच्या बाटल्या खोक्यात आढळून आल्या. पोलिसांनी कारवाईत वाहनासह ५ लाख १८ हजार ४६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, आगामी लोकसभा निवडणूक संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्‍वर रेडी यांच्या आदेशान्वये चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनपर सुचनेनुसार चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर खडकी गावाजवळील बाबा पेट्रोल पंपाजवळ चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे नाकाबंदी लावण्यात आली आहे. अशातच शनिवारी, २३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस निरीक्षक संदीप पाटील, योगेश बेलदार, नितेश पाटील, पंढरीनाथ पवार, पो.कॉ.निलेश पाटील, कल्पेश पगारे, महेंद्र सूर्यवंशी यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत असतांना चाळीसगाव शहरातून खडकी गावाच्या दिशेने मारुती व्हॅन (क्र.एमएच १९ डीव्ही १८७४) ही येतांना दिसली. त्या वाहनावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना संशय आल्याने वाहन चालकास वाहन थांबविल्यानंतर पोलीस स्टॉफसह वाहनाची तपासणी केली. त्यात देशी-विदेशी मद्य आणि बियरच्या बाटल्या खोक्यात आढळून आल्या.

वाहन चालकाकडे कोणताही मद्याच्या वाहतुकीचा परवाना नसल्याने दोन पंचाना लागलीच बोलावुन वाहनाचा झडती पंचनामा केला. त्यात १८ हजार ४६० रुपये किंमतीची देशी-विदेशी आणि बियर मिळून आली आहे. याप्रकरणी वाहन चालक प्रितम बाळकृष्ण देशमुख (वय २६, रा. तळेगाव, ता. चाळीसगाव) यास वाहनासह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here