साईमत, जामनेर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी जामनेर तालुक्यातील नेरी येथील राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व किशोर खोडपे यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांना राज्य सचिव रमेश पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी रा.काँ.चे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष आशिष दामोदर, युवक तालुकाध्यक्ष रुपेश पाटील, हृषिकेश पाटील उपस्थित होते.
शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पक्षाचे विचार जिल्ह्याभरात पोहचविण्यासाठी खूप मेहनत घेणार आहे. पक्ष संघटना मजबूत रीतीने बांधण्याची ग्वाही किशोर खोडपे यांनी त्यांच्या निवडीनंतर दिली.
त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे पक्षांचे ज्येष्ठ नेते दिगंबर पाटील, प्रमोद पाटील, डॉ. मनोहर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, डॉ.प्रशांत पाटील, विभागीय कार्याध्यक्ष निलेश बोदोडे, अनिलकुमार बोहरा, व्ही.पी.पाटील, दिलीप पाटील, प्रल्हाद बोरसे, विश्वजित पाटील, अशोक कोळी, राजू पाटील, दिनेश पाटील यांच्यासह तालुक्यातील रा.काँ.शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे.