साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी ‘न भूतो न भविष्यती’ असा शेकडो कोटींचा निधी आणून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी दिवस रात्र एक करत असताना आ.मंगेश चव्हाण यांनी प्रशासकीय नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या विकास कामात कसा अडथळा निर्माण होईल, याकडे मात्र जास्त लक्ष असताना दिसत आहे. हिरापूर रस्त्यावरील नागरिकांच्या मागणीने आ.मंगेश चव्हाण यांनी मूलभूत सुविधा तथा नागरी सेवा पुरविणे या मागणीचे गांभीर्य ओळखून आजपर्यंत ३० ते ४० वर्षापासून रस्ता, गटार, उद्यान होत नसल्याने जातीने लक्ष घालून भरघोस असा निधी उपलब्ध करून दिला. त्या अनुषंगाने न.पा.अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजासाठी स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या मागणीप्रमाणे कागदपत्राची पूर्तता ही केली. पण कामास कसा अडथळा निर्माण होईल व विकास…
Author: Sharad Bhalerao
साईमत, धानोरा, ता.चोपडा : वार्ताहर धानोरा ते प्रेरणापीठ पिराणा (अहमदाबाद गुजरात) येथुन पदयात्रा रवाना झाली. पदयात्रेला मंगळवारी, २६ मार्च रोजी सकाळी धानोरा गावापासुन निघाली. ही पदयात्रा २६ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत असणार आहे. परमात्याकडे स्वता: पायी चालत गेले पाहिजे, ही श्रध्दा अंगी बाळगून धानोरासह इतर गावाहुन आलेल्या पदयात्रींनी व्यक्त केली. पदयात्रेत सर्वसमाजातील लोक सहभागी होत असल्याने एकात्मतेचे दर्शन होत असते. परम पुज्य महामंडेलेश्वर १००८ श्री स्वामी जनार्दन हरिजी महाराज (फैजपूर संस्थान) यांच्या मार्गदर्शनाखाली पदयात्रेची सुरुवात २००९ पासून केली आहे. सुरुवातीला ही पदयात्रा सुरत ते प्रेरणापीठ अशी पाच वर्ष सुरु केली होती. पदयात्रेत पायी चालणे हे एक प्रकारचे तप मानले जाते.…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आठवडी बाजाराचे मागील आठवड्यात भूमिपूजन झाले होते. मात्र, हे भूमिपूजन झाल्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी ‘समतेचे निळे वादळ’चे संस्थापक-अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांनी प्रत्यक्ष भेट देत स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी तसेच संबंधित ठेकेदाराला बोलावून स्थानिक व्यापाऱ्यांचा संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, याची दखल घेऊन आठवडी बाजारातील नागरिकांच्या समस्या सोडविणार असल्याचे भाई अशांत वानखेडे यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आठवडी बाजाराचे मागील आठवड्यात भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, भूमिपूजनानंतर स्थानिक व्यापाऱ्यांना समोरील सार्वजनिक वाचनालय परिसरात स्थलांतर…
साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्यासाठी जलदगतीने उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार प्रशासकीय काळात सावदा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वत: ठराव मंजूर करून १४ आणि १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरातील गौसियानगर टंचाईग्रस्त भागात नुकतेच कुपनलिकेचे काम पूर्ण केले होते. परंतु विजेच्या डिपीअभावी उन्हाळ्यातही येथील सर्व रहिवाशी कुपनलिकेच्या लाभापासून वंचित राहील, असे वाटत होते. त्यामुळे हा जनहिताचा विषय लवकर मार्गी लावण्यासाठी मंगळवारी, २६ मार्च रोजी अर्जदारांनी थेट आ.चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांना निवेदन देताच क्षणाचाही विलंब न लावता आ.चंद्रकांत पाटील यांनी सावद्याचे मुख्याधिकारी भूषण वर्मा आणि वीज…
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी येथून जवळील वेल्हाळे गावात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने व्यसनमुक्तीची होळी साजरी करण्यात आली. त्यामुळे वेल्हाळे गावातील होळीचा सण चर्चेचा विषय ठरला आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात वेल्हाळेचे ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सदस्य, नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाचे चिटणीस चंद्रकांत चौधरी, रोटरी क्लब ऑफ भुसावळचे सदस्य डॉ.दयाघन राणे यांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी काही शासकीय योजनांची माहिती दिली. वेल्हाळे येथील सरपंच शारदा कोल्हे, भुसावळ येथील प्रख्यात समुपदेशक आरती चौधरी तसेच व्यसनमुक्ती केंद्र संचालक डॉ. वंदना वाघचौरे यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. याप्रसंगी सरपंच शारदा कोल्हे, उपसरपंच हेमंत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर…
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी येथील नगर परिषदेत चार वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे. अशातच नगरपरिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना १५ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. याबाबत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या तक्रारीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शहराला भेट देवून नगर परिषद प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. मात्र, यानंतरही पाण्याची समस्या कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरात पंधरा दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. मात्र, याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसून येत नव्हती. त्यामुळे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. वरणगाव शहराला तापी नदी पात्रातून पाण्याची उचल करून…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील नाभिक समाजातील विविध परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा न्हावी पंचमंडळातर्फे गुणगौरव सोहळ्यात सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे भरीव सहकार्य लाभले. यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या समाज बांधवांनाही विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले होते. पू. साने गुरुजी वाचनालय (टाऊनहॉल) येथे झालेल्या कार्यक्रमात नाभिक समाजातील इयत्ता पहिली ते नववी (लहान गट), इयत्ता दहावी ते सर्व शाखांमधील पदवीपर्यंत (मोठा गट) च्या विद्यार्थ्यांना, आदर्श शिक्षक दत्तात्रय सोनवणे, शास्त्रीय संगीत शिक्षक तुषार देवरे, आयटी इंजिनियर भूषण ठाकरे, रेल्वे स्थानक व्यवस्थापक विशाल…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने विधीवत मंत्रोपचारांच्या मंगल सुरात पर्यावरणपूरक होळी पूजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते ईश्वर अर्जुन धनगर (जिभाऊ कंखरे) सपत्नीक पूजेचे मानकरी होते. श्री.धनगर यांनी होळी पूजनापूर्वी मंगळग्रह मंदिरात श्री सत्यनारायण महापूजेसह अन्य पूजाही केल्या. जवळपास अडीच ते तीन तास एकूण पूजा-विधी चालले. पूजेच्या निमित्त उपस्थित सर्व भाविकांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी होळीसह मंगळग्रह मंदिर परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांच्यासह सेवेकरी व भाविक उपस्थित होते. होळी पूजनानंतर धनगर दाम्पत्यांच्या हस्ते सायंकाळची महाआरती झाली. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावून होलिकोत्सवाचा…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा करण्यास सुरवात झाली आहे. आदिवासी ठाकूरांच्या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे ठाकूर जमातीतील महिला मंडळ पुढाकार घेऊन होळीची तयारी करतात. येथील श्रीराम कॉलनीतील संत सखाराम महाराजांच्या शेतात पारंपरिक पद्धतीने ठाकूर समाजातर्फे होळी साजरी करण्यात आली. उंबरच्या झाडाची फांदी उभी करून खोल खड्यातील पायाशी गवरी ठेवून सामूहिक वर्गणीतून गोळा केलेली कोरडी लाकडं, गवऱ्या रचून होळी उभी केली होती. होळीस सजावट साहित्य, होळीला रंगबिरंगी पताका, फुगे लावून महिलांनी होळी सजविली होती. महिला प्रमुख मिना ठाकूर, सचिव शैलजा शिंदे, कोषाध्यक्ष अपेक्षा पवार, उपाध्यक्ष रेखा ठाकूर, सल्लागार जयश्री वाघ,…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत परिसर आणि गावातील गटारी तसेच स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ केला आहे. दैनिक ‘साईमत’ने काही दिवसांपूर्वी ‘लोहारा ग्रामपंचायतीसमोर घाणीचे साम्राज्य पसरले’, अशा आशयाचे वृत्त ठळक मथळ्याखाली प्रकाशित केले होते. त्याची त्वरित दाखल घेऊन ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत परिसर व गावात स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कर्मचारी आपली कामे चोखपणे करताना पहायला मिळत आहे. वाचनालयासमोरील गटारी स्वच्छ केल्याने वाचक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. अशीच वेळोवेळी तुडुंब भरलेल्या गटारी स्वच्छ केल्या पाहिजेत, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. लोहारा गावातील ग्रामपंचायतीचा कर नागरिकांनी वेळेवर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने नागरिकांना केले आहे.