लोहारा ग्रामपंचायतीतर्फे गटारींच्या सफाई कामाला प्रारंभ

0
3

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत परिसर आणि गावातील गटारी तसेच स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ केला आहे. दैनिक ‘साईमत’ने काही दिवसांपूर्वी ‘लोहारा ग्रामपंचायतीसमोर घाणीचे साम्राज्य पसरले’, अशा आशयाचे वृत्त ठळक मथळ्याखाली प्रकाशित केले होते. त्याची त्वरित दाखल घेऊन ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत परिसर व गावात स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कर्मचारी आपली कामे चोखपणे करताना पहायला मिळत आहे.

वाचनालयासमोरील गटारी स्वच्छ केल्याने वाचक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. अशीच वेळोवेळी तुडुंब भरलेल्या गटारी स्वच्छ केल्या पाहिजेत, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. लोहारा गावातील ग्रामपंचायतीचा कर नागरिकांनी वेळेवर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here