साईमत, यावल : प्रतिनिधी मार्च महिन्यात उन्हाळ्याचे तापमान वाढल्यामुळे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी आणि थंडावा मिळण्यासाठी वाटेल तिकडे भटकंती करीत आहे. अशातच एक बिबट्या बुधवारी रोजी रात्री ग्रामस्थांना व पेट्रोलिंग करणाऱ्या एका पोलिसाला राजोरा फाटा ते निमगावात दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस आणि वन विभागाने चुप्पी साधली आहे. रात्रीच्या वेळेस राजोरा गावाजवळील बाहेरील वस्तीमधील रहिवाशांना तसेच राजोरा फाटा ते निमगाव दरम्यान म्हणजे भुसावळ रस्त्यावर पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसाला बिबट्याचे दर्शन घडले असले तरी याबाबत मात्र पोलीस आणि यावल पूर्व वनक्षेत्रपाल फटांगरे यांच्या वन कर्मचाऱ्यांनी निमगाव परिसरात बिबट्याला पकडण्याचे कोणतेही साहित्य आपल्या सोबत न घेता बिबट्याची पाहणी केली. परंतु…
Author: Sharad Bhalerao
साईमत, सावदा, ता.रावेर : वार्ताहर अनेक दिवसांपासून सुरु असलेली जनावरांची वाहतूक करणारे ट्रक चोरट्या मार्गाने सर्रासपणे सावदा शहरातून थेट रेल्वे स्टेशन रस्त्याने पुढे मार्गस्थ होतात. मात्र, सध्या डीवायएसपी अन्नापुर्णा सिंग फैजपूर यांनी सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांना पकडल्याची पहिली मोठी घटना असल्याचे चर्चिले जात आहे. हा अवैध व्यवसाय थेट शांततेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे याकडे सावदा पोलिसांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत १०५ म्हशींसह ६९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, सर्व म्हशी रावेर येथील गोशाळेत रवाना केल्या आहेत. सविस्तर असे की, सावदा पोलीस ठाण्याच्या…
साईमत, यावल : प्रतिनिधी तालुक्यातील महेलखेडी येथे पंचायत समितीचे माजी सभापती शोभा विलास पाटील यांच्या खळ्याला गुरुवारी, २८ मार्च रोजी दुपारी अचानक आग लागल्याने गावात एकच खळबळ उडाली. आगीत शेतीपयोगी वस्तूंसह गुराढोरांचा चारा जळून खाक झाला आहे. सुदैवाने कुठलीही प्राणहानी झालेली नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यावेळी संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते. मार्च महिना अखेर तापमान वाढत असल्याने ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आग एवढी भयंकर होती की, गावातील नागरिक लागलीच धावून आले. हातात येईल त्या वस्तूने पाण्याच्या भांड्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलीस पाटील यांनी तत्काळ अग्निशामक दलाला कॉल केल्यावर यावल…
साईमत, रावेर : प्रतिनिधी हलाखीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड…लहान बहिणीचे शिक्षण…आणि परिवारासाठी नवीन घर घेण्याचे स्वप्न…घेऊन बारामती येथे खासगी कंपनीत जॉब करणाऱ्या जयेश मराठे याचे ह्दयविकारामुळे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. एकुलता एक मुलगा असल्याने बहिणीने स्मशानभुमीत जाऊन मुखाग्नीडाग दिला. जयेश मागील पंधरा दिवसांपूर्वीच पुणे येथून हॉस्पिटलमधुन ब्रेन स्टोनच्या झटक्यातून बरा होऊन नुकताच रावेर स्वगृही परतला होता. परंतु सकाळी अचानक छातीत दुखायला लागल्याने हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतांना त्याचे निधन झाले. सविस्तर असे की, नोकरीच्या शोधात पाच वर्षापूर्वी सोपान मराठे हे त्यांची पत्नी उषाबाई मराठे, मुलगी खुशी आणि एकुलता एक मुलगा जयेश याला घेऊन रावेर शहरात आले…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी निराधार, बेसहारा, विधवा, दिव्यांग, वयोवृध्द यांच्यासह आदींना विविध योजनांच्या माध्यमातून गरजुंना शासनाच्यावतीने अनुदान देण्यात येते. त्याअनुषंगाने मलकापूर तहसील कार्यालयात बहुसंख्य प्रकरणे प्रलंबित होती. याबाबत अपंग जनता दल संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे सुमारे ४०० प्रकरणे निकाली काढण्यात आले असल्याची माहिती कलीम शेख यांनी दिली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह आदींकडे पाठपुरावा केला होता. परंतु संजय गांधी निराधार विभागात काही वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या एका अधिकाऱ्याने गरजू निराधारांना त्रास देण्याच्या उद्देशाने की काय, त्यांच्या प्रकरणांचा निपटाराच केला नाही. त्यामुळे सर्व प्रकरणी ३०…
साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर येथून जवळील पाळधी येथे संत तुकाराम महाराज वाणी उत्सव समिती व ग्रामस्थांतर्फे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला ह.भ.प.अविनाश महाराज नाचनखेडेकर, माजी पं.स.च्या सभापती नीता पाटील, परीट महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश लिंगायत, माजी सरपंच कमलाकर पाटील, युवा नेते विश्वजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य देवचंद परदेशी, मनोज नेवे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा रुमाल, टोपी, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात तृप्ती वाणी, रोशनी वाणी, अभिषेक वाणी, कांचन चौधरी,…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चोपडा शहरातील मतदान केंद्रांची सद्यस्थिती आणि तेथील मूलभूत व्यवस्था आदींची नुकतीच पाहणी करण्यात आली. यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी पुनर्वसन जळगाव गजेंद्र पाटोळे, चोपडा तालुक्याचे तहसीलदार तथा अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी भाऊसाहेब थोरात, चोपडा नगरपरिषदेचे परीक्षाविधीन मुख्याधिकारी अर्पित चव्हाण, चोपडा मंडळाधिकारी मनोज साळुंखे आदी उपस्थित होते. चोपडा शहरातील विविध प्रभागांमध्ये असलेल्या मतदान केंद्रांमध्ये आदर्श आराखड्यानुसार लाईट, पंखा, पाणी व प्रसाधनगृह आदी मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री त्यांनी केली. मतदान केंद्र पाहणी दरम्यान आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक आणि आरोग्य विभाग या दोघांमधील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी जनसामान्यांना दिलेल्या आरोग्य सेवेबद्दल त्यांचे कौतुक व्हावे आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेच्या नाट्यगृहात नुकताच ‘आशा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी रमेश वाघ होते. यावेळी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर उपस्थित होते. चोपडा तालुक्यात ग्रामीण भागात कार्यरत २२५ ग्रामीण, शहरी भागातील ३३ व १४ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना दिलेल्या आरोग्यसेवेबद्दल त्यांचे कौतुक व्हावे त्याबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी नगरपालिका नाट्यगृह चोपडा येथे ‘आशा दिन’…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथे मराठा समाज मंडळातर्फे श्री संत तुकाराम बीज उत्साहात साजरी करण्यात आली. मंडळाचे यंदाचे आठवे वर्ष होते. यावेळी येथील श्रीराम मंदिरात सकाळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पालकमंत्र्यांनी काही अंतर पालखी खांद्यावर घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी उद्योजक दिलीप पाटील, माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, अरविंद मानकरी उपस्थित होते. मिरवणुकीची सांगता श्री गायत्री शक्ती पीठ मंदिरात करण्यात आली. यावेळी पं. स.चे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी श्री संत तुकाराम बीज शहरात सुरू करणाऱ्या स्व. डॉ.व्ही.आर.पाटील यांच्या आठवणींना उजाळा देऊन समाज बांधवांनी हा संत सेवा उपक्रम सुरू…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगरला प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार, महिला अपराध नियंत्रण संघटना (नवी दिल्ली रजिस्टर भारत सरकार) तालुका शाखेच्यावतीने नुकतीच कार्यकारिणीची बैठक कार्याध्यक्ष बी.डी . गवई यांच्या निवासस्थानी झाली. अध्यक्षस्थानी अधीक्षक मोहन मेढे होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष दिलीप मोहिते, संघटनेचे उपाध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर, कार्याध्यक्ष बी. डी. गवई उपस्थित होते. याप्रसंगी तालुका अधीक्षक मोहन मेढे यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. मोहिते आपल्या संघटनेवर असलेले प्रेम आणि समाजसेवेचा कार्याचा गौरव केला. मानव अधिकार संघटनेची कार्यप्रणाली समजावून सांगितली. महिला कार्यकारिणीही लवकरच जाहीर करण्यात येईल, असे पदाधिकाऱ्यांना सुचित केले. यावेळी तालुकाध्यक्ष भास्कर मिस्तरी, कार्याध्यक्ष बी.डी.गवई, उपाध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर यांनी मनोगत व्यक्त…