पाळधीला वाणी उत्सव समितीतर्फे संत तुकाराम महाराज बीजोत्सव

0
2

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

येथून जवळील पाळधी येथे संत तुकाराम महाराज वाणी उत्सव समिती व ग्रामस्थांतर्फे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला ह.भ.प.अविनाश महाराज नाचनखेडेकर, माजी पं.स.च्या सभापती नीता पाटील, परीट महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश लिंगायत, माजी सरपंच कमलाकर पाटील, युवा नेते विश्‍वजीत पाटील, ग्रामपंचायत सदस्य देवचंद परदेशी, मनोज नेवे आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा रुमाल, टोपी, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात तृप्ती वाणी, रोशनी वाणी, अभिषेक वाणी, कांचन चौधरी, दिशा परदेशी, विवेक वाणी, हितेश वाणी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रत्येक विद्यार्थ्याला मान्यवरांकडून शालेय साहित्य सप्रेम भेट देण्यात आले.

यावेळी ह.भ.प.अविनाश महाराज यांनी मनोगतात संत तुकाराम महाराजांचे जीवन चरित्र सोपे आणि सरळ भाषेत सांगितले. यावेळी सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. मान्यवरांमधून कमलाकर पाटील, रमेश लिंगायत, विश्‍वजीत पाटील, मनोज नेवे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच सायंकाळी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून दिंडी सोहळा विठ्ठलाचा व तुकाराम महाराजांचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरात पार पडला.

यशस्वीतेसाठी प्रकाश वाणी, जनार्दन वाणी, सिताराम वाणी, गोविंद वाणी, संजय वाणी, अंकुश वाणी, अनिल वाणी, सुरेश वाणी, रवींद्र वाणी, बद्रीनाथ वाणी, समाधान वाणी, मुरलीधर वाणी, गोकुळ वाणी, मयूर वाणी, निशांत वाणी, प्रवीण वाणी, श्‍याम वाणी, राधेश्‍याम वाणी, विजय वाणी, गोपाल वाणी, संतोष वाणी, भूषण वाणी, गणेश वाणी, सौरभ वाणी, आकाश वाणी, सागर वाणी, प्रसाद वाणी, राहुल वाणी तसेच महिला मंडळ व संत तुकाराम महाराज वाणी उत्सव समिती व ग्रामस्थ मंडळी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक रुपेश वाणी, सूत्रसंचालन गजानन क्षीरसागर तर आभार प्रमोद वाणी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here