महेलखेडीतील खळ्याला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

0
11

साईमत, यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील महेलखेडी येथे पंचायत समितीचे माजी सभापती शोभा विलास पाटील यांच्या खळ्याला गुरुवारी, २८ मार्च रोजी दुपारी अचानक आग लागल्याने गावात एकच खळबळ उडाली. आगीत शेतीपयोगी वस्तूंसह गुराढोरांचा चारा जळून खाक झाला आहे. सुदैवाने कुठलीही प्राणहानी झालेली नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यावेळी संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते.

मार्च महिना अखेर तापमान वाढत असल्याने ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आग एवढी भयंकर होती की, गावातील नागरिक लागलीच धावून आले. हातात येईल त्या वस्तूने पाण्याच्या भांड्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलीस पाटील यांनी तत्काळ अग्निशामक दलाला कॉल केल्यावर यावल नगर परिषदेचा अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here