चोपडा तालुक्यात ‘आशा दिन’ उत्साहात साजरा

0
3

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

सर्वसामान्य नागरिक आणि आरोग्य विभाग या दोघांमधील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी जनसामान्यांना दिलेल्या आरोग्य सेवेबद्दल त्यांचे कौतुक व्हावे आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने चोपडा नगरपरिषदेच्या नाट्यगृहात नुकताच ‘आशा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी रमेश वाघ होते. यावेळी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर उपस्थित होते.

चोपडा तालुक्यात ग्रामीण भागात कार्यरत २२५ ग्रामीण, शहरी भागातील ३३ व १४ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना दिलेल्या आरोग्यसेवेबद्दल त्यांचे कौतुक व्हावे त्याबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी नगरपालिका नाट्यगृह चोपडा येथे ‘आशा दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी रमेश वाघ यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना सन्मानित करण्यात आले. त्यात अडावद येथील शोभा प्रवीण गायकवाड, चहार्डी येथील मीना युवराज पाटील, धानोरा येथील हपशान अरमान तडवी, गोरगावले येथील शीतल शरद पाटील, हातेड येथील हेमलता महेंद्रसिंग राजपूत, लासुर येथील दीपाली सुनील ढिवरे, वैजापूर येथील सुरमी बुधा पावरा, चोपडा नगरपालिका क्षेत्रातून हिना अयाज पिंजारी आदी आशा स्वयंसेविकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.

याप्रसंगी आशांनी काढलेल्या रांगोळीमध्ये प्रथम क्रमांक प्राथमिक आरोग्य केंद्र, धानोरा, द्वितीय क्रमांक प्राथमिक आरोग्य केंद्र, चहार्डी तर तृतीय क्रमांक शहरी आरोग्य केंद्र, चोपडा शहर यांना देऊन गौरविण्यात आले. गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी अध्यक्षीय भाषणात आशा स्वयंसेविकांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी आशांनी जास्तीत जास्त मतदारांना मतदान करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. तसेच ‘होय मी मतदान करणार’ अशी सर्व आशा स्वयंसेविकांबाबत प्रतिज्ञा घेतली.

तालुक्याचे वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळेचे पर्यवेक्षक किशोर सैंदाणे यांनी क्षयरोग दिनानिमित्त आशांनी केलेल्या कामगिरीबद्दल मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन दिले. यशस्वीतेसाठी जगदीश बाविस्कर, जितेंद्र मोरे, प्रमोद पाटील, दिलावरसिंग वळवी, कमलेश बडगुजर, किशोर सैंदाणे, राजु पवार, गजानन करंदीकर, तालुका समूह संघटक सागर शिंपी, जयश्री तायडे, ज्योती सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर, सूत्रसंचलन विस्तार अधिकारी सुशील सोनवणे तर आभार किशोर सैंदाणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here