साईमत, जळगाव : प्रतिनिधी रावेर लोकसभा मतदार संघांमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सहा निवडणूक अधिकारी देवयानी यादव यांच्या नेतृत्वाखाली सर्व मतदान जनजागृतीकरीता सायकल व मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीचे नियोजन तहसीलदार बंडु कापसे यांनी केले होते. याप्रसंगी संचलन दीपक नगरे यांनी केले. रॅलीत महसूल, पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपालिका, वन विभाग नाईक महाविद्यालय, पोलीस विभाग यांच्यासह सेवाभावी संस्थांचा सहभाग होता. ही रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सावदा रोड, अकोले विद्यालय, चौराहा, चावडी, थडा भाग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोई वाडा, गांधी चौक, आठवडे बाजारमार्गे कमलाबाई गर्ल्स हायस्कुल येथे रॅली आणण्यात येऊन…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जामनेर : प्रतिनिधी भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठीच होळी महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे. युवा पिढीने व्यसनापासून दूर रहावे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून मोठे अधिकारी बनावे आणि देशाची सेवा करावी. माता-भगिनींनी आपल्या संस्कारातून पुढील पिढीला घडवावी. त्यामुळे सद्गुरु ब्रह्मलीन प.पू. लक्ष्मण चैतन्य बापू यांचे वचन आपल्या आचरणात येईल. यासोबत मनातील वाईट दुर्गुणांची होळी करुन दरवर्षी आनंदाने होळी साजरी करा, असे प्रतिपादन चैतन्यधाम येथील गुरुदेव सेवाश्रमाचेे गादीपती प.पू.शाम चैतन्य महाराज यांनी केले. चैतन्यधाम येथील गुरुदेव सेवाश्रम येथे होळी नृत्य महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. महोत्सवात छत्रपती संभाजी नगर, बुलढाणा व जळगाव जिल्ह्यातील बंधू-भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी लोकसभेसाठी मतोत्सवाची घोषणा नुकतीच देशभरात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. चाळीसगाव मतदारसंघातही निवडणूक पूर्वतयारीच्या कामांना वेग आला आहे. मतदान कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, आचारसंहिता कक्षाची स्थापना, मतदान केंद्रांची व्यवस्था त्याचबरोबर मतदार संघातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रोत्साहनपर प्रयत्न होत आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतीच चाळीसगाव मतदारसंघांमध्ये भेट घेऊन निवडणूक पूर्वतयारी कामाचा आढावा घेतला. निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी प्रशांत पाटील, गटशिक्षण अधिकारी तथा नोडल अधिकारी विलास भोई, अप्पर तहसीलदार जगदीश भरकर,…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्यापूर्वी परीक्षेचा अभ्यासक्रम काळजीपूर्वक बघावा. मागील परीक्षांच्या प्रश्न पत्रिका बघून उत्तर पत्रिका लेखनाचा सराव करावा. त्याचबरोबर बहुविध विषयांचे पुस्तके, नियतकालिक तसेच वृत्तपत्रे यांचे नियमित वाचन करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांची आंतरिक प्रेरणा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी कौटुंबिक पाठबळ मोलाचे ठरते. स्पर्धा परीक्षेसाठी वेळ आणि अभ्यासाचे सुसूत्र नियोजन, अभ्यासातील सातत्य, जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमांच्या बळावर निश्चितच यश मिळत असल्याचे प्रतिपादन चोपडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अर्पित चौहान यांनी केले. चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्र…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ जंक्शन शहर हे खऱ्या अर्थाने ‘मिनी हिंदुस्तान’ आहे. त्याचे एक नाही अनेक उदाहरणे आहेत. सर्व जातीचे लोक येथे गुण्या गोविंदाने राहतात. आजपर्यंतच्या इतिहासात कधीही जातीय तेढ निर्माण झाली, अशी घटना शहरात घडली नाही, ही अभिमानाची बाब आहे. तसेच नेहमीच भुसावळकरांचे पोलीस प्रशासनाला सहकार्य असते, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केले. रिंग रोड येथील शिखर इन्स्टिट्युट येथे जळगाव जिल्हा पोलीस, भुसावळ उपविभाग व शिखर ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, तहसीलदार नीता लबडे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन, शहरचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे,…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी लोकशाही देशातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे सार्वत्रिक निवडणुका आहेत. या निवडणुका शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्यात. परंतु मतदानाचे आकडे पाहता दिवसेंदिवस ही टक्केवारी घसरताना दिसते. त्यामुळे बऱ्याचदा योग्य लोकप्रतिनिधी निवडीसाठी नागरिकांना अपयश येते. तसे होऊ नये, यासाठी म्हणजेच योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी केले. मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथील नवीन माध्यमिक विद्यालय येथे आयोजित मतदार जनजागृती उपक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तेे बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रदीप दाणे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर तालुका गटशिक्षणाधिकारी मदन मोरे उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने…
साईमत, यावल : प्रतिनिधी सातपुड्याच्या जंगलात तथा यावल तालुक्यात सर्रासपणे मौल्यवान वृक्षांची वृक्षतोड सुरू आहे. यावल वन विभागाने १ एप्रिल रोजी रात्री अंदाजे बाजारभावाप्रमाणे दोन लाख रुपये किमतीचे खैर जातीचे लाकूड जप्त केले. परंतु वृक्षतोड करणारे आरोपी मिळून न आल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. असे असले तरी सातपुडा जंगलात तथा यावल तालुक्यात सागवानी खैर आणि आदी वृक्षतोड होत असताना सातपुडा डोंगराप्रमाणे वन विभागातील काही ठराविक अधिकारी, कर्मचारीही आपले कर्तव्य करताना तटस्थ भूमिका निभावत आहेत का? याबाबत सातपुडा डोंगर परिसरातील नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावल पश्चिम वनक्षेत्राच्या सामूहिक गोष्टी पथक हे गस्त करीत असताना नाल्यात…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील सीड फार्म भागातील रहिवासी शेख असगर शेख अकबर यांच्या मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी करुन त्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी आशयाची मागणी तालुका मुस्लिम मणियार बिरादरीतर्फे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सविस्तर असे की, येथील शेख असगर शेख अकबर हे त्यांच्या दोन मुले आणि आई-वडिलांसह सीड फार्म भागात वास्तव्यास होते. तसेच गेल्या चार-पाच महिन्यांपासून ते पंचायत समितीत महिला व बाल संगोपन विभागात कंत्राटी बेसवर नोकरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे १ मार्च २०२४ रोजी शेख असगर हे आपली गाडी व बॅग घेऊन कामावर जातो, असे घरी सांगून गेले होते. परंतु शेख असगर कामावर पोहोचलेच…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात घरगुती गॅसचा वापर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये तसेच हटेल व्यवसायिकांना काही गॅस एजन्सीची गॅस हंडी विक्री करून घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास काळाबाजार करत आहे. याकडे पुरवठा अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत. गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या काही एजन्सीची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे रयत सेनेने मंगळवारी, २ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे केली आहे. चाळीसगाव शहरासह तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना व हॉटेल व्यवसायिकांना काही गॅस एजन्सी काळाबाजाराने गॅस सिलेंडरची विक्री करत आहे. गॅसचा सुरू असलेला सर्रास काळाबाजार करणाऱ्याची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. काळाबाजार तात्काळ बंद करून घरगुती गॅस…
साईमत, यावल : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात तसेच फैजपूरसह इतर अनेक ठिकाणी लोकसभा निवडणूक मतदान जनजागृती कार्यक्रम (स्विप) अंतर्गत जनजागृती रॅली व प्रबोधनाचे कार्यक्रम प्रांताधिकारी आणि यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी, २ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आले. लोकसभा निवडणूक मतदान जनजागृती कार्यक्रमाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला. यामध्ये ह.भ.प.संचित कोळी महाराज सरस्वती विद्यामंदिर यावल यांनी मतदानाच्या संदर्भात कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. याप्रसंगी यावल शहरातील शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रांताधिकारी देवयानी यादव, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटशिक्षणाधिकारी तथा मतदान जनजागृती कार्यक्रम नोडल अधिकारी विश्वनाथ धनके, नायब तहसीलदार विनंते, रशीद तडवी, मुख्याध्यापक गजानन कुलकर्णी, मुख्याध्यापक एम. के.पाटील, श्री.नन्नवरे, श्री.काटकर, केंद्रप्रमुख…