गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करा

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरासह तालुक्यात घरगुती गॅसचा वापर अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये तसेच हटेल व्यवसायिकांना काही गॅस एजन्सीची गॅस हंडी विक्री करून घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास काळाबाजार करत आहे. याकडे पुरवठा अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत. गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या काही एजन्सीची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे रयत सेनेने मंगळवारी, २ एप्रिल रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

चाळीसगाव शहरासह तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना व हॉटेल व्यवसायिकांना काही गॅस एजन्सी काळाबाजाराने गॅस सिलेंडरची विक्री करत आहे. गॅसचा सुरू असलेला सर्रास काळाबाजार करणाऱ्याची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. काळाबाजार तात्काळ बंद करून घरगुती गॅस ग्राहकांना गॅसची सुविधा पुरविण्यात यावी, अन्यथा रयत सेनेच्यावतीने येत्या आठ दिवसात चाळीसगाव तहसीलदार कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा रयत सेनेने चाळीसगाव नायब तहसीलदार धनराळे यांना २ एप्रिल २०२४ रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, भ्रष्टाचार निर्मूलन सेनेचे अध्यक्ष खुशाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुकाध्यक्ष संजय हिरेकर, शहराध्यक्ष छोटू अहिरे, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक दीपक देशमुख, शहर उपाध्यक्ष शिवाजी गवळी, प्रकाश गवळी, गोविंद मराठे, किशोर देशमुख, विकास आमले, बापू आमले, शाहिद पिंजारी, अमोल पगारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here