साईमत, चोपडा : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराने केलेल्या खर्चांवर लक्ष ठेवा. तसेच उमेदवाराने आयोजित केलेल्या सभा आणि रॅलीत कोठे आणि किती खर्च होत आहे, यावर नजर ठेवा. यासाठी सभांमध्ये व्हिडिओ कॅमेरा नेऊन त्याचे चित्रीकरण करा, तसा अहवाल सादर करा, अशा सूचना रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संदीपन खान यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. चोपडा तहसील कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांच्यासोबत सहाय्यक खर्च निरीक्षक अशोककुमार शर्मा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश वाघ, निवडणूक नायब तहसीलदार सचिन बांबळे यांच्यासह व्हिडिओ सर्विलन्स टीम,…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७ चाळीसगाव विधानसभा मतदार संघात निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षक कुमार चंदन यांनी कामकाजाचा आढावा घेऊन कंट्रोल रूमला भेट दिली. यावेळी प्रमोद हिले यांनी आपल्या कार्यालयातील विविध टीमच्या कामांची कार्यपद्धती समजावून सांगितली. भेटीदरम्यान एक खिडकी योजना, फ्लार्इंग स्कॉड टीम, व्हिडिओ सर्विलन्स टीम, व्हिडिओ पाहणी टीम, मीडिया टीम, नियंत्रण कक्ष टीम, आचारसंहिता टीम, आयटी सेल यांचे कामकाज समजावून घेतले. त्यानंतर खर्च नियंत्रण टीमचा आढावा घेतला. सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद हिले, सहायक खर्च निरीक्षक माणिक वाघ, तहसीलदार प्रशांत…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील मिनाक्षी निकम यांच्या अपंग आणि दिव्यांगांसाठी स्वयंदीप परिवारातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. अशातच परिवारातील नवापूर येथील दिव्यांग भगिनीला नाशिक जिल्ह्यातील ‘जीवनसाथी’ मिळाला आहे. चाळीसगावला स्वयंदीप परिवारातर्फे दिव्यांग आदिवासी मुलीचे ‘शुभमंगल’ नुकतेच पार पडले. तिचा विवाह नाशिक जिल्ह्यातील पिंपरी, नांदगाव येथील रहिवाशी अनिल कासार यांच्याशी झाला आहे. याबद्दल विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील वडील नसलेली आदिवासी कुटुंबातून कु.रजनी पाडवी ही दिव्यांग मुलगी स्वयंदीप परिवारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून होती. स्वयंदीप संस्था ही दिव्यांग भगिनींसाठी निवासी संस्था आहे. इथे दिव्यांगांचे सर्वपरीने पुनवर्सन केले जाते. त्यात लग्न हाही उद्देश महत्त्वाचा आहे. दिव्यांग भगिनींना निवासी रोजगार…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगाव यांच्या निर्देशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात मतदान जनजागृती व्हावी तथा मतदारांना मतदानाच्या अधिकाराविषयी त्यांचे मत व्यक्त व्हावे, या उद्देशाने इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘ताबुल रसा’ उपक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, शालेय सांस्कृतिक समितीचे सचिव प्रा.सुमित काबरे, प्रा.माधुरी महाजन, प्रा.सोनुसिंग पाटील उपस्थित होते. उपक्रमात मतदान जनजागृतीविषयी महाविद्यालयाचे समान संधी केंद्र समन्वयक प्रा.समीर घोडेस्वार यांनी माहिती दिली. कला शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘वोट फॉर अवर नेशन’, ‘वोटर बेटर इंडिया’, ‘माय वोट माय फ्युचर’, ‘छोड दो अपने सारे काम, पहले…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथे दरवर्षी श्रीराम नवमीनिमित्त गावातून भव्य अशी शोभायात्रा काढली जाते. हे सर्व नियोजन रामराज्य फाउंडेशनचे सर्व सदस्य करीत असतात. यावर्षीही मोठ्या उत्साहाने गुरुवारी, १८ रोजी सायंकाळी रामराज्य गेट येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. गावातून वाजत गाजत श्रीराम जन्मोत्सवाचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत श्रीराम, सीता, लक्ष्मण यांचे सजीव देखावे आणि उंच अशा श्रीराम यांच्या मूर्ती लक्ष वेधून आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या. संपूर्ण गावातून मिरवणूक शांततेत पार पडली. यावेळी लोहारा ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुनील क्षीरसागर, भाजपाचे ज्येेष्ठ कार्यकर्ते शरद सोनार, राहुल कटारिया, श्रीकृष्ण भीवसने, संतोष कोळी, हेमंत गुरव तसेच राजकीय, सामाजिक, नागरिक, महिला, आबालवृद्ध…
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी एप्रिल महिना म्हटला की, गावोगावी अनेक शाळांचे प्रवेशासाठी मोठमोठे बॅनर, फ्लेक्स, जाहिराती पहायला मिळतात. परंतु जि.प.मराठी प्राथमिक शाळा घोडसगाव पुनर्वसन ही शाळा त्याला अपवाद ठरली. ना जाहिरात, ना मोठे मोठे बॅनर, ना फ्लेक्स फक्त आणि फक्त शिक्षकांची कामावरील निष्ठा आणि ग्रामस्थ आणि पालकांना जि.प.शाळेचे पालटलेले महत्त्व त्यामुळे पालकांनी प्रवेशासाठी रांग लावून इयत्ता पहिलीत तब्बल एकाच दिवशी २० प्रवेश (ॲडमिशन) पूर्ण केले. इयत्ता पहिलीत दाखल पात्र बालकांची शाळा पूर्वतयारी अभियानांतर्गत शाळेतील ‘पहिले पाऊल’ मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्यात सकाळपासूनच इयत्ता पहिलीची दाखल पात्र बालके व त्यांचे पालक सहभागी झाले होते. एक एक करत पालकांची प्रवेशासाठी लांबच लांब…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने चोपडा तहसील कार्यालयाच्यावतीने मॅरेथॉन स्पर्धा आणि सायकल रॅलीचे आयोजन केले होते. सुरुवातीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थी, युवक मतदार, सायकल स्वार, क्रीडाशिक्षक तसेच कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेचा मार्ग नवीन प्रशासकीय इमारत परिसरातून चिंच चौक, गुजराती गल्ली, गोल मंदिर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिव्हिल हॉस्पिटल ते पुन्हा नवीन प्रशासकीय इमारतीपर्यंत असा होता. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः सायकल चालवत गावातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रेरित केले. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक…
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी येथील बन्सीलाल नगरातील फुले-शाहू-आंबेडकर बहुजन समितीद्वारा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त स्थानिक सम्राट राजे शिव छत्रपती व्यायाम शाळेच्या पटांगणात उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी ‘समतेचे निळे वादळ’ सामाजिक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अशांतभाई वानखेडे होते. उद्घाटक म्हणून बांधकाम उद्योजक पिंटू दिवाणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संविधानाचे गाढे अभ्यासक ॲड. जी. डी. पाटील, मराठा सेवा संघाचे सामाजिक कार्यकर्ता मुकेश जगताप, जनता कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य केदार एकडे, समाजभूषण एल. सी. मोरे, ‘समतेचे निळे वादळ’चे युवक जिल्हाध्यक्ष ॲड. कुणालभाई वानखेडे, धम्म प्रचारक व पालीभाषा गाढे अभ्यासक शांताराम…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राज्यातील परीट धोबी समाजाला पूर्ववत अनुसूचित जातीच्या प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचे लाभ मिळावेत, अशा गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित प्रश्नावर आजतगायत सत्तेत आलेल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी दुर्लक्ष करून समाजाच्या तोंडाला पाने पुसली असल्याची खंत महाराष्ट्र सकल परीट (धोबी) समाजाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. शहरातील एका हॉटेलमध्ये राज्यातील मराठी व समाविष्ट सर्व उपजातींच्या धोबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी नाशिक येथील ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र आहेर होते. बैठकीला प्रमुख मान्यवर म्हणून संयोजक किसनराव जोर्वेकर, अखिल भारतीय धोबी महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ उंबरकर, माजी प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे, आरक्षण लढ्याचे अभ्यासक अनिल शिंदे, मधुकरराव…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ॲमेच्युअर नेटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्यावतीने २६ ते २९ एप्रिल २०२४ दरम्यान पिंपरी चिंचवड, पुणे येथे १७ व्या सिनिअर नेटबॉल स्पर्धेसाठी मुले-मुली राज्यस्पर्धा होणार आहे. यासाठी रविवारी, २१ एप्रिल रोजी चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण सिनियर कॉलेजच्या क्रीडा मैदानावर सकाळी १० वाजता जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित केली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुले व मुलींचा संघ सहभागी होईल. निवड चाचणीसाठी आधार कार्ड, बोनाफाईड, चार पासपोर्ट फोटो, जन्मदाखला आदी कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे. खेळाडूंनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्यावतीने निवड चाचणीसाठी अध्यक्ष आ.सुरेश भोळे, उपाध्यक्ष खा. उन्मेष पाटील,…