साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी १७ चाळीसगाव विधानसभा मतदार संघात निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षक कुमार चंदन यांनी कामकाजाचा आढावा घेऊन कंट्रोल रूमला भेट दिली. यावेळी प्रमोद हिले यांनी आपल्या कार्यालयातील विविध टीमच्या कामांची कार्यपद्धती समजावून सांगितली. भेटीदरम्यान एक खिडकी योजना, फ्लार्इंग स्कॉड टीम, व्हिडिओ सर्विलन्स टीम, व्हिडिओ पाहणी टीम, मीडिया टीम, नियंत्रण कक्ष टीम, आचारसंहिता टीम, आयटी सेल यांचे कामकाज समजावून घेतले. त्यानंतर खर्च नियंत्रण टीमचा आढावा घेतला. सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद हिले, सहायक खर्च निरीक्षक माणिक वाघ, तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, उपकोषागार अधिकारी प्रशांत सांगळे, निवडणूक नायब तहसीलदार डॉ.संदेश निकुंभ, निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, अव्वल कारकून सचिन मोरे, मंडळ अधिकारी योगेश सोनवणे, शरद पाटील तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारी, पंचायत समिती आणि नगरपालिकेचे कर्मचारी विविध पथकामध्ये उपस्थित होते.
भेटीचे नियोजन डॉ.संदेश निकुंभ, निवडणूक नायब तहसीलदार आणि निवडणूक शाखेचे महसूल सहायक तुशांत अहिरे यांनी यशस्वीपणे पूर्ण केले.