चाळीसगावला नेटबॉल स्पर्धेसाठी रविवारी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा

0
12

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ॲमेच्युअर नेटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्यावतीने २६ ते २९ एप्रिल २०२४ दरम्यान पिंपरी चिंचवड, पुणे येथे १७ व्या सिनिअर नेटबॉल स्पर्धेसाठी मुले-मुली राज्यस्पर्धा होणार आहे. यासाठी रविवारी, २१ एप्रिल रोजी चाळीसगाव येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण सिनियर कॉलेजच्या क्रीडा मैदानावर सकाळी १० वाजता जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुले व मुलींचा संघ सहभागी होईल. निवड चाचणीसाठी आधार कार्ड, बोनाफाईड, चार पासपोर्ट फोटो, जन्मदाखला आदी कागदपत्रांसह हजर राहणे आवश्‍यक आहे. खेळाडूंनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्यावतीने निवड चाचणीसाठी अध्यक्ष आ.सुरेश भोळे, उपाध्यक्ष खा. उन्मेष पाटील, ॲड.रोहीणी खडसे-खेवलकर, किशोर ढाके, मार्गदर्शक एम.वाय.चव्हाण, अजय घोरपडे, सचिव प्रमोद पाटील (मो.९८३४६८००६५), जिल्हा नेटबॉल प्रशिक्षक योगेश पांडे (मो.९१७५९२३३२५) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन केलेे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here