Author: Sharad Bhalerao

वीज घराला लागून गेल्याने घडली घटना साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : येथील यशोधाम येथे घराला वीज लागून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दमदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे यशोधाम येथे घराला वीज लागून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मलकापूर तालुक्यात २ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने दमदार पावसाने हजेरी लावली होती. यशोधाम येथील तक्षशिला बुद्ध विहाराजवळील रहिवासी प्रभाकर नीनू तायडे यांच्या घराच्या कोपऱ्याला वीज लागून गेल्याने घरातील चार पंखे, टीव्ही, लाईट वायरिंग जळून खाक झाली आहे. त्याचबरोबर बाजूला राहत असलेल्या विजय आमोदे यांच्या घरातील दोन पंखे, विजय बुटे यांच्या घरातील तीन पंखे,…

Read More

एस.टी.गजरे यांच्या पुण्यस्मरणार्थ समाधी स्थळावर माल्यार्पण साईमत/यावल/प्रतिनिधी : येथील नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक पदाधिकारी, आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष, शांतता कमिटीचे सदस्य तथा बुद्धवासी सुपडू खंडू उर्फ एस.टी.गजरे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या समाधी स्थळावर माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी यावल शहरातील सर्व स्तरातील पदाधिकारी, कार्यकर्ते दलित चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. माजी नगरसेवक एस.टी. गजरे यांच्या पुण्यस्मरणार्थ यावल येथील राजीव गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक, जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस विजयकुमार एस.गजरे यांनी आणि सिद्धार्थ तरुण मंडळ, पंचशील तरुण मंडळ तसेच मित्र परिवारातर्फे यावल येथे नुकताच संयुक्तिक कार्यक्रम घेण्यात आला.

Read More

जखमींना तातडीने दाखल केले ग्रामीण रूग्णालयात साईमत/रावेर/प्रतिनिधी : तालुक्यातील दोधे गावात वीज कोसळल्याने पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीने ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. सविस्तर असे की, रावेर तालुक्यातील दोधे गावात मंगळवारी, ३ सप्टेंबर रोजी सकाळी वीज कोसळल्याने गावातील रहिवासी मीराबाई प्रताप जमरे (वय ३०), पूजा प्रताप जमरे (वय १३), रेखाबाई खरते (वय ३०), कालू खरते (वय ३०) आणि ज्योती चंद्रसिंग रावत (वय ३२) असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब मूळचे मध्यप्रदेशातील झिरण्या येथील रहिवासी आहेत. उदरनिर्वाहासाठी रावेर तालुक्यातील दोधे येथे शेतीच्या कामासाठी आले होते. प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती गंभीर…

Read More

सहभागाबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासोबत शालेयपयोगी वस्तू दिली भेट साईमत/भुसावळ/प्रतिनिधी: कुठलेही धार्मिक महोत्सव साधारण मोठमोठाली जेवणावळी घालून साजरी करण्याचा एक प्रघात आहे.मात्र, अशा परंपरेला फाटा देत आपल्या धर्माची शिकवण नवजात पिढीला समजावी, या उदात्त हेतूने शहरातील काशीराम नगरमधील नाना-नानी उद्यानाजवळील कपिलेश्वर महादेव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने नुकताच साजरा करण्यात आला. हा वर्धापन दिन कपिल लोणारी, संजय नारखेडे, रवींद्र लढे, संजय भारंबे यांच्या संकल्पनेतून हिंदू धार्मिक प्रश्नोत्तरीय स्पर्धेने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी उपस्थित होते. व्यासपीठावर राजेंद्र लोणारी, संजय नारखेडे, रवींद्र लढे, पत्रकार राकेश कोल्हे, कपिल लोणारी, दीपक लढे यांची उपस्थिती…

Read More

नुकसानीची माहिती देण्याचे आवाहन साईमत/सोयगाव /प्रतिनिधी : प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप २०२४ मध्ये चोला मंडलम एमएस जनरल इन्श्युरन्स कं. लि. यांच्यामार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या काळामध्ये पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्खलन, गारपीट, ढग फूटी, महापूर, दिर्घकाळ पाणी साचून झालेले नुकसान व चक्रीवादळ, वीज पडून लागलेली नैसर्गिक आग आदी कारणांमुळे पिकांचे नुकसान झालेले असल्यास तसेच काढणी पश्चात (१४ दिवस) झालेले नुकसान झालेले असल्यास खरीप हंगाम २०२४ मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान जास्तीच्या पावसामुळे झालेले असल्यास (Excess Rainfall, Inundation, heavy rainfall) हे पर्याय निवडुन ७२ तासात पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन…

Read More

शिबिरात ३१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले रक्तदान, मान्यवरांकडून कौतुक साईमत/जामनेर/प्रतिनिधी : जामनेर तालुका महाराणा उत्सव समिती, जामनेर तालुका केसरीया प्रतिष्ठान, प्रवीणसिंह पाटील, राष्ट्रीय राजपूत करणी सेना खान्देश विभाग टीम, राजपुताना महिला ग्रुप, जामनेर तालुका, पिंपळगाव गोलाईत येथील वसुंधरा फाउंडेशन यांच्यावतीने रेड प्लस रक्तपेढीकडून जामनेर येथील द्वारकाधीश हॉस्पिटल येथे महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान शिबिराला तालुकाभरातून उदंड प्रतिसाद लाभला. शिबिरात जामनेर तालुक्यातील ३१ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. ३१ जणांच्या या सामाजिक योगदानामुळे अनेकांच्या जीवाचा धोका टाळणार आहे, हीच भावना उपस्थितांच्या मनामध्ये होती. विशेष म्हणजे  शिबिराला महिला वर्गाचाही उदंड प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला प.पू.…

Read More

व्यापारी संकुलात पाणी घुसल्याने व्यवसायिकांचे नुकसान साईमत/वरणगाव/प्रतिनिधी : बोदवड तालुक्यातील उजनी येथे उगमस्थान असलेल्या भोगावती नदीला सोमवारी, २ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मोठा पूर आला. त्यामुळे वरणगाव शहरातील नदी पात्रालगतच्या व्यापारी संकुलात पाण्याचा शिरकाव झाल्याने व्यवसायिकांचे नुकसान झाले. बऱ्याच वर्षानंतर नदीला पूर आल्याने नागरिकांनी पूर पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. वरणगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून भोगावती नदी आहे. नदीचे उगमस्थान बोदवड तालुक्यातील हिंदू – मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत न्यामतुल्ला शाह वली पिर बाबा दर्गा उजनी येथुन आहे. नदीला ५० वर्षांपूर्वी बाराही महिने शुद्ध स्वरूपाचे पाणी वाहत होते. मात्र, काळाच्या ओघात नदीचे स्वरूप बदलले आहे. पावसाळ्याच्या दिवसात बोदवड तालुक्यातील उजनी परिसरात मोठ्या…

Read More

हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडले साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी : जिल्ह्यात रविवारपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरुच आहे. दरम्यान, गिरणा धरणातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. ९६.८ टक्के धरण पाण्याने भरले आहे. त्यामुळे गिरणाचे दोन दरवाजे ३० से.मी.ने उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. वाघूर धरणही ९१.६१ टक्के भरले आहे. वाघूर नदीला मोठा पूर आल्याने धरणातील पाणीसाठी वाढत आहे. गिरणा धरणाची आजची पाणी पातळी (वॉटर लेव्हल) ३९७.९३२ मी.पर्यंत आली आहे. त्यामुळे दोन हजार ४४२ क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने धरणाचे १८ दरवाजे उघडून त्यातून ९९ हजार ९४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात…

Read More

जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील चार गावांना नुकसान, सतर्कता बाळगण्याचे आवाहन साईमत/जळगाव/प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांत झालेल्या वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगातून संततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला आहे. त्यामुळे जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील चार गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे. बाधित गावांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच मदतकार्याची गती वाढविण्याबाबत सूचना केल्या. वाघूर नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पुराच्या पाण्याने जीवितहानी वा पशुधनाची हानी झालेली नाही. मात्र वित्तहानी झालेली आहे. बाधित गावांत आवश्यक ती मदत करण्यासाठी जामनेरचे तहसीलदार…

Read More

पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांना प्रेरित करण्याचा उद्देश साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे रविवारी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेत पहिली ते दहावी पर्यंतच्या २४३ विद्यार्थ्यांनी सहभाग होत शाडूमातीचे गणपती बनविले. प्रत्येक विद्यार्थ्याला अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे भिजविलेले मातीचे गोळे मोफत देण्यात आले होते. यंदा उपक्रमाचे चवथे वर्ष होते. कार्यशाळेचे उद्‍घाटन माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, उद्योजक श्याम दरगड यांच्या हस्ते गणपतीची आरती करून करण्यात आले.गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांची जाणीव ठेवून, शाडूमातीपासून गणेश मूर्ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा हा उपक्रम होता. ‘शाडूमातीचा गणपती बनवू या, पर्यावरणाचे रक्षण करु या’ या संदेशाने…

Read More