यशोधामला घरातील इलेक्ट्रॉनिक सामान जळून खाक

0
10
oppo_32

वीज घराला लागून गेल्याने घडली घटना

साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

येथील यशोधाम येथे घराला वीज लागून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दमदार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे यशोधाम येथे घराला वीज लागून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मलकापूर तालुक्यात २ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने दमदार पावसाने हजेरी लावली होती.

यशोधाम येथील तक्षशिला बुद्ध विहाराजवळील रहिवासी प्रभाकर नीनू तायडे यांच्या घराच्या कोपऱ्याला वीज लागून गेल्याने घरातील चार पंखे, टीव्ही, लाईट वायरिंग जळून खाक झाली आहे. त्याचबरोबर बाजूला राहत असलेल्या विजय आमोदे यांच्या घरातील दोन पंखे, विजय बुटे यांच्या घरातील तीन पंखे, टीव्हीत बिघाड झाला आहे. घराच्या भिंतीला वीज लागून गेल्याने घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रभाकर तायडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here