सहभागाबद्दल विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासोबत शालेयपयोगी वस्तू दिली भेट
साईमत/भुसावळ/प्रतिनिधी:
कुठलेही धार्मिक महोत्सव साधारण मोठमोठाली जेवणावळी घालून साजरी करण्याचा एक प्रघात आहे.मात्र, अशा परंपरेला फाटा देत आपल्या धर्माची शिकवण नवजात पिढीला समजावी, या उदात्त हेतूने शहरातील काशीराम नगरमधील नाना-नानी उद्यानाजवळील कपिलेश्वर महादेव मंदिराचा प्रथम वर्धापन दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने नुकताच साजरा करण्यात आला. हा वर्धापन दिन कपिल लोणारी, संजय नारखेडे, रवींद्र लढे, संजय भारंबे यांच्या संकल्पनेतून हिंदू धार्मिक प्रश्नोत्तरीय स्पर्धेने साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष तथा भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी उपस्थित होते. व्यासपीठावर राजेंद्र लोणारी, संजय नारखेडे, रवींद्र लढे, पत्रकार राकेश कोल्हे, कपिल लोणारी, दीपक लढे यांची उपस्थिती होती.
स्पर्धेत इयत्ता तिसरी ते पाचवी लहान गट तर इयत्ता सहावी ते नववी मोठा गट अशा दोन गटातील विद्यार्थी पात्र होते. स्पर्धेत १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत दोन्ही गटातील दहा – दहा विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले होते. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीद्वारे पहिले तीन विजेते काढण्यात आले. स्पर्धेत सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्रासोबत शालेयपयोगी कंपासपेटी भेट म्हणून देण्यात आली. स्पर्धेत ईश्वर चिठ्ठीद्वारे मिळालेले पारितोषिक लावण्या कपिल लोणारी ह्या चिमुकलीने आर्यन सोनवणे यास देत दातृत्वाचा आदर्श निर्माण केला.
यांनी मिळविले शभंर टक्के गुण
लहान गटात दर्शिका झटकार, अनया भागवत, आस्था पाटील, ध्रुव पाटील, अर्जुन भागवत, जीविका दुसाने, चक्षू वाघुलाडे, जय महाजन, ज्ञानिका लोणारी, हर्ष बेलदार यांचा समावेश होता. मोठ्या गटात भाग्येश दुसाने, ओनिषा कोळी, लावण्या लोणारी, दिव्या कोळी, हिंदवी पाटील, हिताली भिरूड, प्रांजल गाजरे, आर्यन सोनवणे, भावेश सोनवणे, नम्रता सूर्यवंशी यांचा समावेश होता. ईश्वर चिठ्ठीद्वारे काढण्यात आलेल्या विजेत्यांमध्ये लहान गटात – प्रथम दर्शिका झटकार, द्वितीय अनया भागवत, तृतीय आस्था पाटील, मोठ्या गटात – प्रथम भाग्येश दुसाने, द्वितीय ओनिषा कोळी, तृतीय लावण्या लोणारी यांचा समावेश आहे.
यांनी घेतले परिश्रम
परीक्षक म्हणून श्रीकांत जोशी, मनीषा कुलकर्णी, दर्पणा कुलकर्णी, अमोल जाधव, अश्विनी वैद्य यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी महेंद्र किनगे, उमेश नारखेडे, राजूभाऊ लढे, भूषण जोशी, अशोक कुळकर्णी, अनिल लढे, चंद्रकांत बऱ्हाटे, जगदीश भारंबे, योगेश बऱ्हाटे, रितेश कोल्हे, सुनील भारेबे, संजय झांबरे, सरजू सावंत, संजय भिरुड, सुभाष पाटील, चोलदास गाजरे, यशवंत जावळे, हेमंत सावंत, चेतन चौधरी, किशोर इंगळे, सीताराम अत्तरदे पी.जे कोल्हे, मुरलीधर बढे यांच्यासह जय बजरंग मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भूषण वैद्य यांनी केले.