यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते रुग्णांना फळ वाटप

0
7

एस.टी.गजरे यांच्या पुण्यस्मरणार्थ समाधी स्थळावर माल्यार्पण

साईमत/यावल/प्रतिनिधी :

येथील नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक पदाधिकारी, आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष, शांतता कमिटीचे सदस्य तथा बुद्धवासी सुपडू खंडू उर्फ एस.टी.गजरे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या समाधी स्थळावर माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी यावल शहरातील सर्व स्तरातील पदाधिकारी, कार्यकर्ते दलित चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी नगरसेवक एस.टी. गजरे यांच्या पुण्यस्मरणार्थ यावल येथील राजीव गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक, जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस विजयकुमार एस.गजरे यांनी आणि सिद्धार्थ तरुण मंडळ, पंचशील तरुण मंडळ तसेच मित्र परिवारातर्फे यावल येथे नुकताच संयुक्तिक कार्यक्रम घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here