Author: Sharad Bhalerao

साईमत/धरणगाव/प्रतिनिधी धरणगाव येथील प्रभाकर देवचंद तायडे (हिंगोणेकर वय ७८) यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी, ३१ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. ते मिलिंद हिंगोणेकर, सिद्धार्थ हिंगोणेकर, आनंद हिंगोणेकर यांचे वडील होत.

Read More

आसोद्यातील सार्वजनिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी महापुरुष आणि त्यांची विकसित विचारधारा ही देशाची संपत्ती आहे.त्यांचा त्याग आणि शौर्याच्या इतिहासाने देश घडतात. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वातील कणखरपणा देशाला वेगळ्या उंचीवर नेणारा ठरला असल्याचे मत सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल महाजन यांनी व्यक्त केले. ते आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आयोजित सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगतात बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित सचिव विलास चौधरी यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थिनी देवयानी माळी, रुचिता सूर्यवंशी यांनी महापुरुषांच्या…

Read More

वैध अर्जांमध्ये १६ अपक्ष उमेदवारांचा समावेश, माघारीकडे लागले लक्ष साईमत/जामनेर/प्रतिनिधी जामनेर विधानसभा मतदार संघातून राजकीय पक्षांचे प्रमुख उमेदवार मंत्री गिरीष दत्तात्रय महाजन (भाजपा), जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप बळीराम खोडपे सर (महाविकास आघाडी), विशाल मोरे (बसपा), अण्णासाहेब रामचंद्र राठोड (हिंदू समाज पार्टी), प्रभाकर साळवे (राष्ट्रीय समाज पक्ष), मदन शंकर चव्हाण (भारतीय जनसम्राट पार्टी) यांच्यासह १६ अपक्ष उमेदवारांचे अर्ज बुधवारी, ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननीत वैध ठरल्याचे विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना मोरे यांनी जाहीर केले आहे. मतदार संघातून २२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ते सर्व छाननीनंतर वैध ठरले आहेत. येथील विधानसभा मतदारसंघात २६ उमेदवारांकडून ३४ उमेदवारी अर्ज…

Read More

स्व.तुकाराम कोळी यांच्या मुलाचा भाजपात प्रवेश साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी तालुक्यात महाविकास आघाडीची पडझड सुरुच आहे. अशातच २८ ऑक्टोबर रोजी शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. चाळीसगाव सह उत्तर महाराष्ट्रात ज्यांनी शिवसेना आणली आणि वाढवली असे शिवसेनेचे भीष्म पितामह आणि कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते स्व.तुकाराम मामा कोळी यांचे चिरंजीव रघुनाथ तुकाराम कोळी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आ. मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत कोळी समाजाचे असंख्य समाजबांधव भाजपात गेल्याने शिवसेना उबाठा गटाला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. समाजबांधव यांच्यासोबत चर्चा आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन रघुनाथ कोळी यांनी तालुक्याचे आ.मंगेश चव्हाण यांचे…

Read More

भुसावळ शहरातील द्वारका नगर परिसरातील घटना साईमत/भुसावळ/प्रतिनिधी शहरातील द्वारका नगर परिसरात तरूण विवाहित महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास भुसावळात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पसार होण्याच्या प्रयत्नातील आरोपी पतीला मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. वर्षा अक्षय गुंजाळ (वय २२) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या द्वारकानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या मागे त्यांच्या आजीकडे तात्पुरत्या रहिवासी म्हणून आलेल्या होत्या. मंगळवारी वर्षा गुंजाळ ह्या घरी होत्या. त्यानंतर दुपारी वर्षा गुंजाळ यांच्या डोक्यात धारदार वस्तूने वार करून त्यांचा खून करण्यात आला. पती-पत्नीमध्ये वाद होऊन पतीनेच पत्नीचा खून…

Read More

उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले लिखित पथनाट्यातून केले समाज प्रबोधन साईमत/यावल/प्रतिनिधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे तसेच जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील व माध्यमिकच्या कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण जिल्ह्यात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार यावल आणि रावेर विधानसभा मतदारसंघांत यावल तालुक्यातील यावल शहरात यावल पंचायत समिती, यावल महसूल विभाग व शिक्षण विभागाच्यावतीने मतदान जनजागृती करण्यासाठी “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” पथनाट्याचे अत्यंत अभ्यासपूर्ण व मनोरंजक पद्धतीने प्रबोधनात्मक सादरीकरण केले. याप्रसंगी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पंचायत समितीच्या बीडीओ डॉ.मंजुश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, केंद्रप्रमुख शाकीर, कविता गोहिल,…

Read More

गणेश, दुर्गा पुरस्कार सोहळ्याची ‘गो’ पूजनाने सुरुवात साईमत/फैजपूर/प्रतिनिधी हिंदूंनी विशेषतः तरुणांनी गणेश, दुर्गोत्सव तसेच अन्य सण साजरे करतांना त्यास सनातन सकल हिंदू समरसता व धार्मिक परंपरेने साजरे करावेत. हिंदू संस्कृतीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्यात परिवर्तन होणे काळाची खरी गरज आहे. हा गरजेचा शुभारंभ रामराज्य सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आणि फैजपूर शहरातून होत आहे, त्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी केले. शहरातील रामराज्य सेवाभावी संस्थेतर्फे गणेशोत्सवातील ‘एक दुर्वा समर्पणाची’ आणि दुर्गोत्सवातील ‘एक जागरण अंबा मातेचे’ अशा स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात संत महंत यांच्या हस्ते ‘गो’ पूजनाने करण्यात…

Read More

बेरोजगारांना रोजगारासाठी राजू भाेई यांनी व्यक्त केला होता मानस साईमत/फैजपूर/प्रतिनिधी नोकरीचे प्रमाण कमी झाल्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळावा, शहरात नवीन उद्योग व्यापार सुरु झाल्यास बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, लहान-मोठ्या उद्योग व्यवसायांनाही चालना मिळेल, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजू भाेई यांनी सुरभी मंगल कार्यालय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता. अशा सुरभी मंगल कार्यालयाचे भूमिपूजन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी आमदार शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, यावल शेतकी संघाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजचे चेअरमन शरद महाजन, सुनील वाढे, अनिल नारखेडे, सतीश अग्रवाल भुसावळ, मनोज कुमार पाटील, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, माजी नगराध्यक्ष बापू वाघुळदे,…

Read More

वाहतुकीची कोंडी फोडण्याचे पोलिसांसमोर आव्हान; प्रशासन अपघाताची वाट पाहत आहे काय ? नागरिकांचा संताप सवाल ! साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी जळगाव-छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफवरील पहुर जवळील वाघूर नदी पूल परिसर अनधिकृत वाहनतळ बनला आहे.पोलिसांसमोर वाहतुकीची कोंडी फोडण्याचे आव्हान उभे टाकले आहे. प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे काय? असा संतप्त प्रश्न सामान्य नागरिकांसह वाहन,चालकांमधून उपस्थित होत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने वाहनांची प्रचंड गर्दी मुख्य महामार्गावर होताना दिसून येत आहे. रविवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी तर चक्क पुलावरच काही नागरिकांनी आपली वाहने पार्क केल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक खोळंबली होती. वाघूर नदीवर उभारलेल्या दोन्ही फुलांच्या आजूबाजूचा परिसर दुचाकी वाहनांनी…

Read More

जळगावातील सुमंगल महिला मंडळाच्या संकल्पनेतून राबविला स्तुत्य उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी दिवाळी आली की, प्रत्येकाच्या घरात फराळ, नवीन कपडे, फटाके अशा सर्व गोष्टी मुलांना मिळत असतात. परंतु गरीब वाडी वस्तीवरची मुले या गोष्टीपासून वंचित राहतात. म्हणूनच जळगावातील सुमंगल महिला मंडळ यांच्या संकल्पनेतून एक छोटासा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. शिरसोली येथील सज्जन्मिया धरणाजवळील वस्तीवर आणि मोहाडी जवळील पावरापाडा याठिकाणी दिवाळीनिमित्त मुलांना खाऊ आणि महिलांना साडी वाटप करण्यात आली. तसेच प्रत्येक मुलाच्या हातात मेणबत्ती दिली. मेणबत्तीसारखा प्रकाश तुमच्या जीवनात यावा आणि खुप शिकुन मोठे व्हा, असा संदेश सुमंगल महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यांची होती उपस्थिती यावेळी महिला…

Read More