जळगावातील सुमंगल महिला मंडळाच्या संकल्पनेतून राबविला स्तुत्य उपक्रम
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
दिवाळी आली की, प्रत्येकाच्या घरात फराळ, नवीन कपडे, फटाके अशा सर्व गोष्टी मुलांना मिळत असतात. परंतु गरीब वाडी वस्तीवरची मुले या गोष्टीपासून वंचित राहतात. म्हणूनच जळगावातील सुमंगल महिला मंडळ यांच्या संकल्पनेतून एक छोटासा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
शिरसोली येथील सज्जन्मिया धरणाजवळील वस्तीवर आणि मोहाडी जवळील पावरापाडा याठिकाणी दिवाळीनिमित्त मुलांना खाऊ आणि महिलांना साडी वाटप करण्यात आली. तसेच प्रत्येक मुलाच्या हातात मेणबत्ती दिली. मेणबत्तीसारखा प्रकाश तुमच्या जीवनात यावा आणि खुप शिकुन मोठे व्हा, असा संदेश सुमंगल महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यांची होती उपस्थिती
यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा सरला वाणी, अरूणा नेवाडकर, प्रतिभा नावरकर, सीमा कोठावदे, अलका पितृभक्त उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी श्री.नेवाडकर यांचे सहकार्य लाभले.