चाळीसगावात शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का

0
12

स्व.तुकाराम कोळी यांच्या मुलाचा भाजपात प्रवेश

साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी

तालुक्यात महाविकास आघाडीची पडझड सुरुच आहे. अशातच २८ ऑक्टोबर रोजी शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. चाळीसगाव सह उत्तर महाराष्ट्रात ज्यांनी शिवसेना आणली आणि वाढवली असे शिवसेनेचे भीष्म पितामह आणि कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते स्व.तुकाराम मामा कोळी यांचे चिरंजीव रघुनाथ तुकाराम कोळी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आ. मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत कोळी समाजाचे असंख्य समाजबांधव भाजपात गेल्याने शिवसेना उबाठा गटाला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. समाजबांधव यांच्यासोबत चर्चा आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन रघुनाथ कोळी यांनी तालुक्याचे आ.मंगेश चव्हाण यांचे नेतृत्व स्वीकारत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here